गुन्हेगारी

सांगोल्यात कायदा-सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान, लाठ्या काठ्या, तलवारी घेऊन मारणारी, ३३ जणांवर गुन्हा!

  1. सांगोल्यात कायदा-सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान, लाठ्या काठ्या, तलवारी घेऊन मारणारी, ३३ जणांवर गुन्हा!

सांगोला (प्रतिनिधी): शहरातील शेतकरी महिला सूत गिरणीसमोरील हायवेच्या बाजूला दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत तब्बल ३३ जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून, पोलिसांच्या उपस्थितीतच तलवारी, लाठ्या, काठ्यांसह झालेल्या या मारामारीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली असून आरोपींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३१ मार्च रोजी सायंकाळी आठच्या सुमारास शेतकरी महिला सुत गिरणी सांगोला समोरील हायवे रोडच्या पलीकडे दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणतंटा व वाद सुरू असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सपोनि मोरे, सपोनि वाघे, पोउपनि पाटील, पोउपनि काशीद, पोहेकॉ सावंत, पोहेकॉ शेख, पोहेकॉ मेटकरी, पोहेकॉ काझी, पोकॉ वाघमोडे, पोकॉ माळी, पोकॉ पाटील, पोकॉ कळकुंचे असे शेतकरी महिला सुत गिरणी सांगोला समोरील हायवे रोडच्या बाजूला भांडणाच्या ठिकाणी गेले.

त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात लाठ्या काठ्यानी सज्ज होवुन हाणामारी भांडणतंटा चालू होता. पोलिसांनी जमावाची पांगापाग करत ५ पेक्षा जास्त लोकांनी थांबु नका, तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल सांगितले. पोलीस दोन्ही गटातील लोकांना समजावुन सांगत असताना देखील दोन्ही गटातील इसमानी एकमेकांच्या अंगावर जाऊन शिवीगाळी करुन मारामारी करु लागले. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेत असताना बंडू दामू मासाळ यांच्या हातात तलवार होती. पोलिसांनी त्यांना तलवारीसह ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी एकमेकांशी दोन गटात भांडण करुन सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या सचिन ज्ञानेश्वर हजारे, काशिलिंग पांडुरंग गाडेकर, अतुल विष्णू येडगे, दत्तात्रय नाना झेडगे, गणेश शिवाजी नवले, सागर दाजी मोरे, सुभाष शिवाजी मेटकरी, दीपक राजाराम वगरे, विक्रम विलास मेटकरी, सुरज तानाजी मेटकरी, दीपक दत्तात्रय मासाळ, अतिक रहमान मुजावर, अरमान फारुक शेख, बंडू दामू मासाळ, शरद रामचंद्र मासाळ, विलास मारुती खांडेकर, पैगंबर गुलाब मुलाणी, आदिनाथ कल्लाप्पा वारे, सोमनाथ मारुती मंडले, नागेश बापू मोरे, बिरा दामू मासाळ, अंकुश तुकाराम शेंबडे, वैभव रावसाहेब शेंबडे, सिद्धेश्वर तुकाराम शेंबडे, बाळू भिमा मेटकरी, शिवाजी बापू मेटकरी, तानाजी आनंदा मेटकरी, कुमार आनंदा मेटकरी, उल्हास गोरख मेटकरी, प्रभाकर यशवंत सरगर, रावसाहेब शिवाजी मेटकरी, बाबू बापू मेटकरी, युवराज बाळू मेटकरी यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील लोकांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बनसोडे करीत आहेत. सांगोल्यासारख्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकं एकत्रित येऊन दंगल होणं आणि त्यात तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा वापर होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!