गुन्हेगारी

सांगोला पोलिसांची अवैध वाळू माफियांवर कारवाई! १ कोटी २१ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

६ जणांवर गुन्हा, ३ जेसीबीसह २ ट्रॅक्टर-ट्रॉली व टिप्पर पोलिसांच्या ताब्यात

सांगोला पोलिसांची अवैध वाळू माफियांवर कारवाई! १ कोटी २१ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

६ जणांवर गुन्हा, ३ जेसीबीसह २ ट्रॅक्टर-ट्रॉली व टिप्पर पोलिसांच्या ताब्यात

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १ कोटी २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी निखील महादेव नायकुडे रा. भोपसेवाडी, ता. सांगोला, रामचंद्र अर्जुन आगलावे रा. आगलावेवाडी, ता. सांगोला, स्वप्निल दत्तात्रय तोडकर रा. आगलावेवाडी, ता. सांगोला, रोहन महादेव देवकते रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, शेखर युवराज लवटे रा. आलेगाव, ता. सांगोला, समाधान महादेव हजारे रा. पांढरे वस्ती, जवळा, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलिस ठाण्याच्या रात्रगस्त पथकाला जवळा येथील पांढरे वस्ती परिसरातील कोरड्या नदीपात्रात काही जण जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर-ट्रॉली आणि टिप्परद्वारे वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक विनोद दुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला. पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता नदीपात्रात यंत्रसामग्रीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसराला वेढा घालत कारवाई केली. यावेळी तीन जेसीबींच्या मदतीने वाळू उपसा करून दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एका टिप्परमध्ये वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ वाहन चालकांना ताब्यात घेतले. मात्र एका जेसीबीचा चालक समाधान महादेव हजारे रा. पांढरे वस्ती, जवळा हा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी निखील महादेव नायकुडे रा. भोपसेवाडी, ता. सांगोला, रामचंद्र अर्जुन आगलावे रा. आगलावेवाडी, ता. सांगोला, स्वप्निल दत्तात्रय तोडकर रा. आगलावेवाडी, ता. सांगोला, रोहन महादेव देवकते रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, शेखर युवराज लवटे रा. आलेगाव, ता. सांगोला, समाधान महादेव हजारे रा. पांढरे वस्ती, जवळा, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संबंधितांकडे वाळू उपसा अथवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध परवाने, रॉयल्टी पास किंवा शासनाची मंजुरी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाच्या मालकीच्या गौण खनिजाची चोरी करून महसुलाचे नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान ३ जेसीबीसह २ ट्रॅक्टर-ट्रॉली व टिप्पर, वाळू असा १ कोटी २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि गुरव, पोउपनि सागर पाटील, पोहेकॉ अस्लम काझी, पोहेकॉ नवनाथ सावंत, पोकॉ सद्दाम नदाफ, पोकॉ मच्छिंद्र माळी, पोकॉ मारुती पांढरे व चापोकॉ सोमनाथ भुई यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!