सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा विक्रम; दीड कोटी मे.टन उसातून १.३८ कोटी क्विंटल साखर उत्पादन
पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात अव्वल; सिद्धेश्वर साखर कारखान्याचा उतारा सर्वाधिक

सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा विक्रम; दीड कोटी मे.टन उसातून १.३८ कोटी क्विंटल साखर उत्पादन
पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात अव्वल; सिद्धेश्वर साखर कारखान्याचा उतारा सर्वाधिक
सांगोला (दिलीप घुले): सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या २०२५-२६ गाळप हंगामात साखर उद्योगाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी आणि २३ खाजगी अशा ३५ साखर कारखान्यांनी २६ फेब्रुवारी २०२६ अखेर १ कोटी ५७ लाख ३४ हजार ६२५ मे.टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी ८.८३ टक्के साखर उताऱ्याने १ कोटी ३८ लाख ९५ हजार ३०६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपाच्या बाबतीत पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात आघाडीवर असून, तर निव्वळ साखर उताऱ्यात कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखाना (१०.८८टक्के) आघाडीवर आहे. तसेच जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी तर २३ खाजगी अशा ३५ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. २६ फेब्रुवारी २०२६ अखेर १२ सहकारी साखर कारखान्यांनी ६५ लाख ७९ हजार ४७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ५८ लाख ९९५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ८.८२ टक्के राहिला आहे. तर २३ खाजगी साखर कारखान्यांनी ९१ लाख ५५ हजार १५३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ९४ हजार ३११ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.८४ टक्के राहिला आहे.
संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा 2,96,230 मे.टन गाळप, 2,94,900 क्विंटल साखर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव 4,69,817 मे.टन गाळप, 2,93,300 क्विंटल साखर, जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव 6,48,717 मे.टन गाळप, 5,00,250 क्विंटल साखर, दि सासवड माळी शुगर माळीनगर 3,72,314 मे.टन गाळप, 3,19,940 क्विंटल साखर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर 9,64,007 मे.टन गाळप, 9,74,615 क्विंटल साखर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे 3,70,236 मे.टन गाळप, 2,85,414 क्विंटल साखर, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे 5,08,320 मे. टन गाळप, 5,46,340 क्विंटल साखर, जकराया शुगर वटवटे 3,34,854 मे. टन गाळप, 2,05,700 क्विंटल साखर, श्री पांडुरंग श्रीपुर 9,40,222 मे.टन गाळप, 8,52,790 क्विंटल साखर, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स खामगाव, बार्शी 3,51,412 मे. टन गाळप,3,28,250 क्विंटल साखर, सिताराम महाराज खर्डी 5,18,272 मे.टन गाळप, 4,28,350 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर आलेगाव 3,67,969 मे.टन गाळप, 3,74,217 क्विंटल साखर, बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी 6,69,505 मे.टन गाळप, 7,08,455 क्विंटल साखर, युटोपियन शुगर कचरेवाडी 4,00,110 मे.टन गाळप, 2,92,870 क्विंटल साखर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी 2,41,147 मे.टन गाळप, 2,37,225 क्विंटल साखर, व्ही.पी.शुगर तडवळ अक्कलकोट 6,79,113 मे.टन. गाळप, 6,32,900 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ 2,29,600 मे.टन गाळप, 2,23,850 क्विंटल साखर, श्री संत कुर्मदास पडसाळी 1,44,370 मे.टन गाळप, 1,20,050 क्विंटल साखर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे 3,28,690 मे.टन गाळप, 2,63,850 क्विंटल साखर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज 768470 मे.टन गाळप, 7,27,775 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे युनिट २ करकंब 5,24,451 मे.टन गाळप 4,86,150 क्विंटल साखर, श्री.शंकर कारखाना सदाशिवनगर 2,54,520 मे.टन गाळप, 2,01,850 क्विंटल साखर, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर मंगळवेढा 4,08,891 मे.टन.गाळप, 4,29,340 क्विंटल साखर, लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज बीबीदारफळ 2,35,572 मे. टन गाळप, 1,72,620 क्विंटल साखर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी 5,02,460 मे.टन गाळप, 4,30,710 क्विंटल साखर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज अनगर 5,44,460 मे.टन गाळप, 5,77,600 क्विंटल साखर, धाराशिव साखर कारखाना (सांगोला) वाकी शिवणे 1,67,285 मे.टन गाळप, 1,47,200 क्विंटल साखर, विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे करमाळा 4,06,819 मे.टन गाळप, 3,79,500 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर 15,54,562 मे.टन गाळप, 10,33,900 क्विंटल साखर, आष्टी शुगर आष्टी 3,57,213 मे.टन गाळप, 3,16,000 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी 3,45,121 मे.टन गाळप, 3,21,000 क्विंटल साखर, लोकशक्ती शुगर अँड आलाईड इंडस्ट्रीज औराद मंद्रुप 1,51,345 मे. टन गाळप, 1,58,930 क्विंटल साखर, इंद्रेश्वर शुगर उपळाई 2,35,584 मे.टन गाळप, 2,22,300 क्विंटल साखर, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर 2,15,888 मे टन गाळप, 1,78,200 क्विंटल साखर, मातोश्री लक्ष्मी कोजनरेशन इंडस्ट्रीज लि. रुद्देवाडी, ता. अक्कलकोट 2,27,080 मे. टन गाळप, 2,28,965 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाने यंदाच्या २०२५-२६ गाळप हंगामात पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत उत्पादनाचा नवा टप्पा गाठला आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. उसाचे भरघोस उत्पादन, वेळेवर गाळप आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर यामुळे जिल्ह्याच्या साखर उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झाला असून उर्वरित कारखान्यांमध्ये अजूनही गाळप सुरू आहे.




I pay a quick visit every day some web sites and blogs
to read articles or reviews, however this weblog gives feature based writing.