विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवावर! हलदहिवडीतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवावर! हलदहिवडीतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे इलेक्ट्रिक मोटारीची केबल जोडण्यासाठी वीजेच्या खांबावर चढलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत तरुण पांडुरंग माने यांची आई रमाबाई वसंत माने यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश बिभीषण येडगे व योगेश हनुमंत मोरे दोघेही रा. हलदहिवडी ता.सांगोला या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी रमाबाई वसंत माने यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार १९ मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास सांगोला हलदहिवडी येथील फिर्यादी रमाबाई माने यांचा मुलगा पांडुरंग वसंत माने (वय ३१) हा घरी असताना गावातील अनिल गायकवाड हा त्यांच्या घरी आला. गणेश येडगे व योगेश मोरे यांनी इलेक्ट्रिक मोटारीची केबल खांबावर जोडण्यासाठी बोलावले असल्याचे सांगितले. त्यानंतर पांडुरंग माने हा झोपेतून उठुन बाहेर आला व त्याने अनिल गायकवाड यास विचारणा केली त्यावेळी त्याने गणेश येडगे यांचे शेतातील इलेक्ट्रिक खांबावरती आकडा टाकायचा आहे, गणेश येडगे व योगेश मोरे हे ईलेक्ट्रीक खांबाजवळ थांबले आहेत, त्यांना केबल जोडायची आहे, असे सांगीतले. त्यावेळी पांडुरंग हा अनिल गायकवाड याचे सोबत गेला. त्यावेळी पांडुरंग यांची आई त्यास जाऊ नको असे सांगत होती, त्यावेळी मुलगा पांडुरंग हा आकडा जोडून लगेच आलो असे म्हणुन तो अनिल गायकवाड याचे सोबत गेला.
हलदहिवडी चौकातील खांबाखाली गणेश बिभिषण येडगे व योगेश हनुमंत मोरे हे उभे असल्याचे व मुलगा पांडुरंग हा त्यांचे जवळ गेला असल्याचे आई रमाबाई यांनी पाहीले होते. लाईटचे काम असल्याने रमाबाई या घरासमोरील अंगणात थांबुन मुलाकडे पहात होत्या. पांडुरंग हा ईलेक्ट्रीक खांबावर गेल्यानंतर गणेश येडगे याने पांडुरंग यांच्या हातात त्याचे हातातील केबल दिली. त्यानंतर पांडुरंग हा खांबावरील तारेवर केबलचा आकडा टाकत असताना तेथे अचानक जाळ व धूर झाला व पांडुरंग हा खांबावरून खाली पडला. त्यावेळी तेथे खाली थांबलेले गणेश येडगे व योगेश मोरे हे दोघे पळुन गेले. मीदरम्यान, पांडुरंग यांच्या आई रमाबाई या त्या ठिकाणी पळत गेल्या व मुलास पाहीले असता पांडुरंग तोंडास, छातीस, हातास भाजुन जखमा झाल्या होत्या. त्यानंतर गावातील नातेवाईक उमेश कदम यांचे गाडीतुन सांगोला येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारास दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्याचेवर प्राथमीक उपचार केला. त्यानंतर पांडुरंग यास पुढील उपचारासाठी मिरज येथे दाखल केले व तेथे त्याचेवरती उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, पांडुरंग माने यांच्यावर उपचार सुरू असताना २६ मे रोजी डॉक्टरांनी पांडुरंग माने हा मयत झाला असल्याचे सांगीतले.
दरम्यान, फिर्यादी रमाबाई वसंत माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा पांडुरंग यास इलेक्ट्रिक कामाचे जुजबी ज्ञान असून त्यास इलेक्ट्रिक कामाबाबतचे कोणतेही तांत्रीक ज्ञान नव्हते. तसेच गणेश येडगे व योगेश मोरे यांनी पांडुरंग यास खांबावरती चढताना प्लास्टिक बुट, हातमोजे अथवा इतर कोणतेही सुरक्षा साधने दिली नव्हती. तसेच मयत पांडुरंग माने या गणेश येडगे व योगेश मोरे यांनी त्यांची ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी त्यांचे कोणतेही ईलेक्ट्रीक कनेक्शन नसताना तसेच ईलेक्ट्रीक तारेमध्ये विद्युतप्रवाह चालू असल्याचे माहीत असताना देखील त्यास ईलेक्ट्रीक खांबावर चढण्यास सांगीतले. त्यामुळे माझे मुलास ईलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्यास जळाल्याच्या जखमा झाल्या तसेच तो खांबावरून खाली पडला त्यामुळे त्यास उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. माझा मुलगा पांडुरंग माने यांच्या मृत्युस गणेश येडगे व योगेश मोरे हे कारणीभुत आहेत अशी फिर्याद मयत पांडुरंग माने यांची आई रमाबाई माने यांची सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे.



