सोलापूरचा साखर हंगाम गोड! १.५९ कोटी टन उसाचे गाळप; पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना आघाडीवर
धुराडी थंडावली, पण एफआरपीचा प्रश्न कायम! विक्रमी गाळपानंतरही शेतकऱ्यांत नाराजी; १.४१ कोटी क्विंटल साखर उत्पादन

सोलापूरचा साखर हंगाम गोड! १.५९ कोटी टन उसाचे गाळप; पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना आघाडीवर
धुराडी थंडावली, पण एफआरपीचा प्रश्न कायम! विक्रमी गाळपानंतरही शेतकऱ्यांत नाराजी; १.४१ कोटी क्विंटल साखर उत्पादन
सांगोला (दिलीप घुले): सोलापूर जिल्ह्यातील २०२५–२६ चा साखर गाळप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने विक्रमी ठरला आहे. जिल्ह्यातील १२ सहकारी व २३ खाजगी अशा एकूण ३५ साखर कारखान्यांनी ६ मार्च २०२६ अखेर तब्बल १ कोटी ५९ लाख ४४ हजार ६२३ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी ८.८५ टक्के साखर उताऱ्याने १ कोटी ४१ लाख १३ हजार २४१ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपाच्या बाबतीत पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात आघाडीवर राहिला असून जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी तर २३ खाजगी अशा ३५ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. ६ मार्च २०२६ अखेर १२ सहकारी साखर कारखान्यांनी ६६ लाख ४० हजार ९४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ५८ लाख ८० हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ८.८५ टक्के राहिला आहे. तर २३ खाजगी साखर कारखान्यांनी ९३ लाख ०३ हजार ६८२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८२ लाख ३२ हजार ९८६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.८५ टक्के राहिला आहे.
संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा 3,00,448 मे.टन गाळप, 3,01,550 क्विंटल साखर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव 4,86,878 मे.टन गाळप, 3,05,800 क्विंटल साखर, जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव 6,65,479 मे.टन गाळप, 5,16,050 क्विंटल साखर, दि सासवड माळी शुगर माळीनगर 3,72,314 मे.टन गाळप, 3,19,940 क्विंटल साखर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर 9,64,007 मे.टन गाळप, 9,74,615 क्विंटल साखर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे 3,70,236 मे.टन गाळप, 2,85,414 क्विंटल साखर, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे 5,65,572 मे. टन गाळप, 6,18,950 क्विंटल साखर, जकराया शुगर वटवटे 3,34,854 मे. टन गाळप, 2,05,700 क्विंटल साखर, श्री पांडुरंग श्रीपुर 9,40,222 मे.टन गाळप, 8,52,790 क्विंटल साखर, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स खामगाव, बार्शी 3,53,037 मे. टन गाळप, 3,30,750 क्विंटल साखर, सिताराम महाराज खर्डी 5,40,754 मे.टन गाळप, 4,39,050 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर आलेगाव 3,67,969 मे.टन गाळप, 3,74,217 क्विंटल साखर, बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी 6,69,505 मे.टन गाळप, 7,08,455 क्विंटल साखर, युटोपियन शुगर कचरेवाडी 4,00,110 मे.टन गाळप, 2,92,870 क्विंटल साखर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी 2,41,147 मे.टन गाळप, 2,37,225 क्विंटल साखर, व्ही.पी.शुगर तडवळ अक्कलकोट 6,82,501 मे.टन. गाळप, 6,35,600 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ 2,29,600 मे.टन गाळप, 2,23,850 क्विंटल साखर, श्री संत कुर्मदास पडसाळी 1,44,370 मे.टन गाळप, 1,20,050 क्विंटल साखर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे 3,28,690 मे.टन गाळप, 2,63,850 क्विंटल साखर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज 7,68,470 मे.टन गाळप, 7,27,775 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे युनिट २ करकंब 5,24,451 मे.टन गाळप 4,86,150 क्विंटल साखर, श्री.शंकर कारखाना सदाशिवनगर 2,54,520 मे.टन गाळप, 2,01,850 क्विंटल साखर, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर मंगळवेढा 4,08,891 मे.टन.गाळप, 4,29,340 क्विंटल साखर, लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज बीबीदारफळ 2,35,572 मे. टन गाळप, 1,72,620 क्विंटल साखर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी 5,02,460 मे.टन गाळप, 4,30,710 क्विंटल साखर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज अनगर 5,69,158 मे.टन गाळप, 6,09,570 क्विंटल साखर, धाराशिव साखर कारखाना (सांगोला) वाकी शिवणे 1,67,285 मे.टन गाळप, 1,47,200 क्विंटल साखर, विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे करमाळा 4,06,819 मे.टन गाळप, 3,79,500 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर 15,54,562 मे.टन गाळप, 10,33,900 क्विंटल साखर, आष्टी शुगर आष्टी 4,03,882 मे.टन गाळप, 3,61,450 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी 3,45,121 मे.टन गाळप, 3,21,000 क्विंटल साखर, लोकशक्ती शुगर अँड आलाईड इंडस्ट्रीज औराद मंद्रुप 1,51,345 मे. टन गाळप, 1,58,930 क्विंटल साखर, इंद्रेश्वर शुगर उपळाई 2,36,464 मे.टन गाळप, 2,24,100 क्विंटल साखर, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर 2,15,888 मे टन गाळप, 1,78,200 क्विंटल साखर, मातोश्री लक्ष्मी कोजनरेशन इंडस्ट्रीज लि. रुद्देवाडी, ता. अक्कलकोट 2,42,043 मे. टन गाळप, 2,44,220 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केला असून त्यांच्या धूराड्यांनाही आता विश्रांती मिळाली आहे. हंगाम संपल्यानंतर ऊसतोड मजूरही आपल्या मूळ गावी परतले आहेत. यंदाचा हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने गोड ठरला असला, तरी अनेक साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही, यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्हा हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या हंगामात सहकारी कारखान्यांपेक्षा खाजगी साखर कारखान्यांनी अधिक गाळपावर भर दिल्याचे चित्र दिसून आले आहे.



