महाराष्ट्र

वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीचाही मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील घटना

वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीचाही मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील घटना

सांगोला (प्रतिनिधी): वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपास करते, वडाची पूजा करते आणि देवाकडे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करते. मात्र, याच पवित्र दिवशी पंढरपूर तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना समोर आली. पतीला दीर्घ आयुष्य देण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. पतीला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावलेल्या पत्नीचाही काही क्षणांत विजेच्या प्रवाहात मृत्यू झाला. आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या या शेतकरी दाम्पत्याने अखेरचा श्वासही एकत्र घेतल्याने आंबे गावासह संपूर्ण पंढरपूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) या शेतकरी दाम्पत्याचा रविवारी पहाटे विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. विजेचा शॉक लागल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही आपला जीव गमवावा लागला आहे. या काळीज हेलावणाऱ्या घटनेमुळे आंबे गावावर आणि संपूर्ण परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. लक्ष्मण बाबू नागणे (वय 60) आणि अलका लक्ष्मण नागणे (55) अशी या मृत शेतकरी पती-पत्नीची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावच्या परिसरात शेती पंपाची वीज पहाटे पावणे पाच वाजता येते. रविवारी रात्रभर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीवरील विजेची मोटार बंद करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण नागणे हे पहाटेच्या सुमारास गेले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे तिथे वीज प्रवाहाचा बिघाड झाला होता. मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण नागणे यांना विजेचा जोरदार शॉक लागला. आपल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे आणि ते विव्हळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या अत्यंत घाबरल्या. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या तात्काळ त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाऊस आणि ओलाव्यामुळे वीज प्रवाह वेगाने पसरला असल्याने अलका नागणे यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्दैवी अपघातात काही क्षणांतच शेतकरी पती-पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच आंबे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही छत्र हरपल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या शेतकरी दाम्पत्याच्या मागे असलेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. एकत्र संसार केला आणि जगाचा निरोप घेतानाही दोघे एकमेकांचा हात धरूनच गेले. आजच्या दिवशी अलका या वडाची पूजा करून लक्ष्मण यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करणार होत्या, पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. वटपौर्णिमेच्याच पहाटे या सुखी संसाराचा असा करुण अंत झाल्याचे समजताच आंबे गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी पती-पत्नीची अंत्ययात्रा निघणार असल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!