गुन्हेगारी

देशी बैलांना परराज्यात पाठवण्याचा कट फसला, सांगोला पोलिसांची कारवाई

तीन देशी बैलांची सुटका, पिकअपसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी बैलांना परराज्यात पाठवण्याचा कट फसला, सांगोला पोलिसांची कारवाई

तीन देशी बैलांची सुटका, पिकअपसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला (प्रतिनिधी): खिलार जनावरांसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या सांगोला येथील आठवडा बाजारातून देशी बैल परराज्यात निर्दयीपणे वाहतूक करत नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. सांगोला पोलिसांनी कारवाई करत तीन देशी बैलांची सुटका केली असून पिकअपसह सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम लिगप्पा तोरवी (वय ३०), आकाश दत्ता तोरवी (वय २८) आणि दत्ता धर्माण्णा तोरवी (वय ५५, सर्व रा. टाकळी, ता. चडचण, जि. विजापूर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ८ मार्च) पहाटे साडेतीनच्या सुमारास वाणीचिंचाळे हद्दीत वाणी चिंचाळे ते घेरडी रोडवर बोलेरो पिकअप या वाहनात तीन देशी बैलांना क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने कोंबून नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सांगोला पोलिसांनी सापळा रचत वाहन अडवले असता बैलांना अमानुष पद्धतीने लोखंडी अँगलला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना चारा-पाणी अथवा उपचाराची कोणतीही सुविधा नव्हती. अत्यंत कमी जागेत हालचालही करता येणार नाही अशा स्थितीत त्यांना परराज्यात नेत असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीचे तीन देशी बैल असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मारुती दत्ता पांढरे यांनी दिली असून पुढील तपास पोलिस नाईक नलवडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!