नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सूर्योदय परिवाराकडून गौरव
जि.प. व पंचायत समिती सदस्यांचा निवासस्थानी जाऊन सत्कार; सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सूर्योदय परिवाराकडून गौरव
जि.प. व पंचायत समिती सदस्यांचा निवासस्थानी जाऊन सत्कार; सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सूर्योदय उद्योग समूह आणि सूर्योदय परिवाराच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
औद्योगीकरण, अर्थकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या सूर्योदय समूहाची गुणीजनांचा सन्मान करण्याची परंपरा असून, नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध गटांमधील सदस्यांचा समावेश होता.
सन्मान सोहळ्याद्वारे लोकप्रतिनिधींना जनसेवेच्या कार्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उदात्त हेतू असल्याचे अनिलभाऊ इंगवले यांनी स्पष्ट केले. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची गती वाढावी, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी आणि तळागाळातील प्रश्नांना प्राधान्य मिळावे, या दृष्टिकोनातून हा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य तसेच नगरपरिषदेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचा गौरव सूर्योदय परिवाराकडून करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रतिनिधींच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची परंपरा पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सूर्योदय समूहाशी संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजकारणाचा दीपस्तंभ असलेल्या सूर्योदय समूहाकडून झालेल्या सन्मानामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याच्या भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केल्या.
नूतन जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार, अतुल पवार, दादासाहेब लवटे, किरण पांढरे, शोभाताई खटकाळे, संगीता मोटे आणि सिंधुताई आलदर या जिल्हा परिषद सदस्यांचा त्याचबरोबर अजय सरगर, डॉ सदाशिव दबडे, बाळासाहेब बंडगर, अमृत पाटील, अशोक चोरमुले आणि बापूसो जावीर, सौ पूनम इंगवले, सौ.राणीताई पाटील, सौ. काजल काशीद, सौ.छायाताई कोळेकर, सौ.स्मिता गोडसे, सौ.सुवर्णा नवले, सौ.सोनाली पाटील आणि सौ.वंदना शेळके या पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
आपल्या भागातील विकासासाठी तन-मन-धनाच्या पलीकडे विचार करत जनसेवेचा वसा घेऊन जनतेची मने जिंकणाऱ्या सर्वपक्षीय नूतन सदस्यांचा सन्मान सूर्योदय परिवाराकडून वेळोवेळी करण्यात येतो. यापूर्वी सांगोला तालुक्यातील एकाच वेळी तब्बल ६१ ग्रामपंचायती मधून निवडून आलेल्या अपक्षांसहित सर्वपक्षीय सदस्यांचा सन्मान देखील सूर्योदय परिवाराकडून करण्यात आला होता. महिनाभरापूर्वी सांगोला नगरपरिषदेमधील लोकनियुक्त नगराध्यक्षांसह सर्व नूतन नगरसेवकांचा सन्मान देखील सांगोला शहरांमध्ये नव्याने उभारलेल्या सूर्योदय बँक्वेट हॉलमध्ये सूर्योदय परिवाराच्या वतीने उत्साही वातावरणामध्ये करण्यात आला होता.
व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय समूहाकडून नवनिर्वाचित सदस्यांना जनसेवेसाठी प्रेरणा मिळावी याकरिता सन्मान केला जात असल्याची माहितीही यावेळी अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. यावेळी सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय मॉलचे संचालक जगन्नाथ भगत गुरुजी, एलकेपी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी तसेच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले इत्यादी उपस्थित होते. समाजकारणाचा दिपस्तंभ असलेल्या सूर्योदय समूहाकडून झालेल्या सन्मानामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याच्या भावना यावेळी बोलताना अनेक सदस्यांनी बोलून दाखवल्या.



