समाजपयोगी उपक्रमांनी माणगंगा परिवाराचे संस्थापक नितिन (आबासाहेब) इंगोले यांचा वाढदिवस साजरा

समाजपयोगी उपक्रमांनी माणगंगा परिवाराचे संस्थापक नितिन (आबासाहेब) इंगोले यांचा वाढदिवस साजरा
सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त माणगंगा परिवाराच्या सदस्यांनी वृक्षारोपण, मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप असे विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी माणगंगा परिवारातील सदस्यांनी ५०० झाडांचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली.
माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त माणगंगा परिवाराच्या वतीने शाखा हतीद येथे हातीद ग्रामपंचायत व संपूर्ण ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थांचा आनंद, उत्साह आणि एकजुटीमुळे हा उपक्रम अधिकच यशस्वी झाला.
यावेळी ज्येष्ठ नेते बबन घाडगे, सरपंच संगीता घाडगे, कुलदीप घाडगे, माजी सरपंच आप्पासाहेब घाडगे, सोसायटीचे चेअरमन दादासाहेब घाडगे, अमोल पवार, विलास घाडगे, आनंद भंडगे, बबन भगत, भारत देशमुखे, अरुण माळी, हिम्मत घाडगे, शाखाधिकारी सुनील सावंत यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महूद येथे महूद ग्रामपंचायत व संपूर्ण ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास महूद गावचे सरपंच कल्याण लुबाळ, हरिभाऊ येडगे, बिरुदेव येडगे गुरुजी, जाधव वस्ताद, युवा नेते नवनाथ पाटील, युवा नेते अभिजीत कांबळे, सिताराम कांबळे, बापूसाहेब लुबाळ, बाबासाहेब केसकर, महादेव येडगे, विश्वास लवटे, सूरज ढाळे, सुरेश ढोले, माणगंगा परीवार अर्बनचे संचालक विजय वाघमोडे, शाखाधिकारी महेंद्र लवटे, अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच शिवणे गावात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच दादा घाडगे, उपसरपंच उदयसिंह घाडगे, बँकेचे संचालक विवेक घाडगे, विक्रम घाडगे, अनिल घाडगे, दत्तात्रय पाटील, धनंजय घाडगे, प्रकाश वाघमोडे, बबन जानकर, विठ्ठल माळी उपस्थित होते.
माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रि सो लि शाखा मंगळवेढा यांच्या वतीने माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळा मंगळवेढा येथे मिष्ठान्न भोजन व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमोल निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे संचालक महादेव शिंदे, गजानन देवकर, धनंजय पवार, सिताराम भगरे, विकास जाधव, रावसाहेब नागणे, चंद्रकांत सुरवसे, शाखाधिकारी सतीश गायकवाड व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
तसेच मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या शेजारी पाण्याच्या टाकीजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा.नवनाथ जगताप, सीताराम भगरे, महादेव शिंदे, गजानन देवकर, रावसाहेब नागणे, चद्रकांत सुरवसे, शाखाधिकारी सतीश गायकवाड व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
माणगंगा परिवाराचे संस्थापक चेअरमन नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शाखेच्या वतीने राजापुर ता.सांगोला येथील सुंदर आश्रमशाळा परिसरात सामाजिक बाधिलकी जोपासत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक संचालक सचिन इंगोले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे, उद्योगपती प्रताप येलपले, सांगोला शाखाधिकारी सिद्धेश्वर आवताडे, गंगाई दूध संस्थेचे चेअरमन अरुण सुरवसे, शाळेचे सचिव सागर कांबळे, जयेश कांबळे, मुख्याध्यापक, शिक्षक, बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
माणगंगा परिवाराचे संस्थापक चेअरमन नितीन (आबासाहेब) इंगोले यांना वाढदिवसाच्या निमित्ताने माणगंगा परिवारातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे अधिकारी व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक विवेक घाडगे, संचालक विजय वाघमोडे, संचालक सचिन इंगोले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे, सर्व शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.