सामाजिक

सांगोल्यात ७६ ग्रामपंचायतींकडे हातपंप दुरुस्तीची २० लाखांची थकबाकी

१२५३ हातपंपांपैकी ३९७ बंद; वर्गणी न भरल्याने देखभाल ठप्प; उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती

सांगोल्यात ७६ ग्रामपंचायतींकडे हातपंप दुरुस्तीची २० लाखांची थकबाकी

१२५३ हातपंपांपैकी ३९७ बंद; वर्गणी न भरल्याने देखभाल ठप्प; उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील गाव, वाडी-वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा कणा असलेल्या हातपंप व्यवस्थेकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे. हातपंपांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली वार्षिक वर्गणी न भरल्यामुळे तब्बल ७६ ग्रामपंचायतींकडे सुमारे २० लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. थकबाकी प्रलंबित असल्यामुळे हातपंपांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. याचा थेट परिणाम गाव, वाडी-वस्त्यांतील नागरिकांवर होत असून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

सांगोला तालुक्यात एकूण १२५३ हातपंप असून त्यापैकी ८५६ हातपंप बारमाही आहेत. अनेक हातपंप अर्धवट कार्यरत, काही पूर्णपणे बंद, तर काही आठमाही स्वरूपात चालू आहेत. दुरुस्तीअभावी अनेक हातपंप बिघडलेले किंवा निष्क्रिय पडले असून नागरिकांना पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. हातपंपांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींनी करारनामे केले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समितीला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हातपंपांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या संबंधित विभागाशी करारनामे केलेले आहेत. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्यात वार्षिक वर्गणी भरणे बंधनकारक आहे. वर्गणी भरल्यानंतरच हातपंप यांत्रिकी विभाग दुरुस्ती करतो. मात्र, ग्रामपंचायती एप्रिलमध्ये वर्गणी भरत नाहीत. हातपंप बंद पडल्यावरच ‘घाईघाईने’ पैसे भरले जातात. त्यामुळे अनेक हातपंप देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहतात.

७६ ग्रामपंचायतींकडून सुमारे २० लाख रुपये पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे थकीत आहेत. निधी न आल्यामुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत. आवश्यक साहित्य खरेदी ठप्प राहिली आहे. यामुळे प्रशासनही अक्षरशः हतबल झाले आहे. तालुक्यात एकूण १२५३ हातपंप असून त्यापैकी ८५६ हातपंप बारमाही कार्यरत असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हातपंप बंद, तर काही ठिकाणी दुरुस्तीअभावी निष्क्रिय पडले आहेत. काही हातपंप आठमाही, तर काही कायमस्वरूपी बंद अवस्थेत आहेत.

वर्गणी भरल्यानंतरच हातपंप यांत्रिकी विभागाकडून नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. मात्र, बहुतेक ग्रामपंचायती एप्रिलमध्ये वर्गणी भरण्याऐवजी गरज भासली की पैसे भरतात. ग्रामपंचायतींकडून वर्गणीच न आल्यामुळे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधी उपलब्ध होत नाही. परिणामी, दुरुस्तीचे नियोजन रखडले असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!