राजकीय

चेतनसिंह केदार सावंतांचा झंझावात: जिल्ह्यात भाजपला मिळाला ‘गेमचेंजर’ चेहरा!”

“चेतनसिंह केदार सावंतांचा झंझावात: जिल्ह्यात भाजपला मिळाला ‘गेमचेंजर’ चेहरा!”

सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या उमेदीचा, आक्रमक नेतृत्वाचा आणि संघटनशक्तीचा संगम ठरलेले नाव म्हणजे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत! जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापतीपदी थेट संधी मिळवत त्यांनी केवळ राजकीय पायरी चढली नाही, तर भाजपला जिल्ह्यात एक आश्वासक, दमदार आणि भविष्यातील निर्णायक चेहरा मिळाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

नगरसेवक ते उपनगराध्यक्ष, भाजप तालुकाध्यक्ष ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आता थेट जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य सभापती—चेतनसिंह सावंत यांची राजकीय वाटचाल ही वेग, संघर्ष आणि यशाचा संगम ठरली आहे. दोन वेळा उपनगराध्यक्षपद भूषवताना त्यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्काचा भक्कम पाया रचला, तर जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजप संघटनाला नवसंजीवनी दिली.

संघटनशक्तीचा विक्रम: राज्यात अव्वल नोंदणी!
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देत सावंत यांनी संघटन कौशल्याची झलक दाखवली. गावागावात, वाड्यावस्त्यांवर पक्ष पोहोचवण्याचे काम त्यांनी अक्षरशः मिशन मोडमध्ये केले. सांगोला पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवत त्यांनी इतिहास घडवला. चोपडी जिल्हा परिषद गटातून तब्बल सहा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत त्यांनी आपली जनाधाराची ताकद सिद्ध केली. तसेच पहिल्यांदा पंचायत समितीत देखील एक सदस्य निवडून आणण्याची किमया केली.
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा, तर कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य किट वाटप करून भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे काम केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणाशी घट्ट जोडलेले असल्याचे दिसून आले. प्रत्येक दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारे सावंत हे ‘ग्राउंड कनेक्ट’ असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. बूथ स्तरापर्यंत संपर्क ठेवत त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली सावंत यांचे नेतृत्व अधिक परिपक्व झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमालाही त्यांनी गती दिली.

आक्रमकता, अभ्यासू वृत्ती, जनसंपर्क आणि संघटन यांचा मिलाफ असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत हे भाजपसाठी ‘लंबी रेसचा घोडा’ मानले जात आहेत. राजकीय चढ-उतारातून तावून सुलाखून निघालेल्या या नेतृत्वाकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत हे ‘की प्लेअर’ ठरण्याची चिन्हे आहेत. तरुणांना सोबत घेत, संघटन अधिक भक्कम करत त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
चेतनसिंह केदार सावंत हे केवळ एक पदाधिकारी नाहीत, तर सोलापूर भाजपच्या भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपला मिळालेला हा ‘आश्वासक चेहरा’ आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देईल, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!