सामाजिक

सांगोला – पंढरपूर महामार्ग नव्हे… साक्षात मृत्यूचा सापळा !

महामार्गावर वाहतूक नियमांची ‘ऐशीतैशी’; वाहनांची जीवघेणी स्पर्धा, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

सांगोला – पंढरपूर महामार्ग नव्हे… साक्षात मृत्यूचा सापळा !

महामार्गावर वाहतूक नियमांची ‘ऐशीतैशी’; वाहनांची जीवघेणी स्पर्धा, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला–पंढरपूर महामार्गावर रस्ते वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज होणारे अपघात, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, बेफाम वेगाने धावणारी वाहने आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे या मार्गावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागांनी तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन, अतिवेग, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे तसेच धोकादायक ओव्हरटेक यामुळे या मार्गावर प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरत आहे.

दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सांगोला–पंढरपूर मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे, खड्डे, अपुरे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर व पथदिव्यांचा अभाव असून काही ठिकाणे अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जात आहेत. या मार्गावर वेगमर्यादेचे पालन होत नसल्याने तसेच वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने दुचाकीस्वार, चारचाकी चालक व पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नियमबाह्य ओव्हरटेक, महामार्गाच्या कडेला चुकीच्या ठिकाणी वाहन उभे करणे, युटर्नवर वेगाने वाहन चालविणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत.

महामार्गावरील अनेक ठिकाणी धोकादायक वळणे, मोठे खड्डे, अपुरे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टरचा अभाव, पथदिवे नसणे तसेच योग्य स्पीड ब्रेकर नसल्याने दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट असूनही त्याकडे संबंधित विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रविवारी सायंकाळी या मार्गावर भीषण अपघात झाला. भंगार वाहतूक करणाऱ्या मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भंगार वाहतूक करणाऱ्या मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रामचंद्र पांडुरंग बनसोडे (वय ५८) व लक्ष्मीबाई रामचंद्र बनसोडे (वय ५०, रा. बामणी, ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत.

महामार्गावर वाढत चाललेल्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर, इशारा फलक, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था व वेग नियंत्रणाची साधने बसवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सुरक्षा उपाययोजना तातडीने न केल्यास स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सांगोला–पंढरपूर महामार्गावरील परिस्थिती पाहता हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या मार्गावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, सूचनाफलक, रिफ्लेक्टर, पथदिवे तसेच इतर मूलभूत सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक व पादचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!