यशोगाथा

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी

सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड तिसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरीचा विजेता

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी

सोलापूरचा ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाड तिसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरीचा विजेता

सांगोला (प्रतिनिधी): नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून ही मानाची चांदीची गदा पटकावण्याची कामगिरी केली आहे. हर्षवर्धनने महेंद्र याच्यावर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह हर्षवर्धनची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली. हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी गदा जिंकणारा एकूण सातवा कुस्तीपटू ठरला. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंग झालं.

पुण्यातील वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहेत. ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी केले होते. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे याच्या उपस्थितीमध्ये फायनल कुस्ती लावण्यात आली होती. फायनलमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने ४-३ ने विजय मिळवला. लाल कॉस्ट्यूममध्ये हर्षवर्धन सदगीर आणि निळ्या कॉस्ट्यूममध्ये महेंद्र गायकवाड खेळत होता. नाशिकला त्याच्या रूपाने दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मिळाला आहे. तर हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा डबल केसरी ठरला आहे.

सहा मिनिटांचे दोन राऊंड असतात, त्यामधील पहिल्या राऊंडमध्ये दोघांनी एक एक गुण घेतला होता. पहिल्या राऊंडमध्ये गुणांची बरोबरी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघेही आक्रमक झाले होते. शेवटच्या दीड मिनिटांमध्ये तीन गुण मिळवत सदगीरने आघाडी घेतली. गायकवाडनेही तीन गुण मिळवले पण वेळ संपल्याने तो पराभूत झाला.

महाराष्ट्र केसरीमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने जय पाटीलचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख या दोन तगड्या पैलवानांमध्ये लढत झाली आणि महेंद्रने सिकंदरला धोबीपछाड देत अंतिम फेरी गाठली होती. अखेरीस महेंद्र गायकवाडलाही निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हर्षवर्धन सदगीरने याआधी २०२०चा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यावेळी त्याने वेताळ शेळकेचा पराभव करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धनने आता सहा वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारत मानाच्या गादीवर नाव कोरलं.

हर्षवर्धन सदगीर याचा प्रवास

हर्षवर्धन सदगीर याने गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये सोलापूर शहरच्या जयराम पाटील याला पराभूत केले होते. अंतिम फेरीमध्ये १०-० ने हर्षवर्धन याने एकहाती विजय मिळवला होता. उपांत्य फेरीमध्ये हर्षवर्धन सदगीर याने पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला होता. हर्षवर्धन सदगीर याने याआधी २०२०चा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यावेळी त्याने वेताळ शेळकेला पराभूत करत पहिल्यांदा किताब पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धन याने सहा वर्षांनी फायनलपर्यंत कमबॅक करत विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

सोलापूरचा बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्र गायकवाड याने माती विभागामध्ये चपळ चिता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या सिकंदर शेखला ३-०ने पराभूत केले होते. पहिल्या राऊंडमध्येच त्याने सिकंदरवर आक्रमण चढवलं होतं. सिकंदरसारख्या तगड्या मल्लाला त्याने एकही गुण घेऊन दिला नाही. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाड याने सोलापूरच्या रविराज चव्हाण याला पराभूत केले होते. रविराजचा महेंद्रने १०-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. कडाडणाऱ्या टाळ्या, शड्डूंचे घुमणारे आवाज आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या उत्कंठावर्धक वातावरणात ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याने हायव्होल्टेज अंतिम लढतीत बलाढ्य सिकंदर शेखला आस्मान दाखवले.

महाराष्ट्र केसरी २०२६ चा विजेता हर्षवर्धन सदगीर याला मानाची गदा, फॉर्च्युनर कार आणि पाच लाख मिळणार आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडला स्कॉर्पिओ आणि चार लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १८ बुलेटही वजनी गटातील विजेत्यांना देण्यात आल्या आहेत.


माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी

माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर जिल्ह्यातून महेंद्र गायकवाड आणि हिंगोली जिल्ह्यातून सिकंदर शेख आमने सामने आले होते. या कुस्तीत महेंद्र गायकवाड यानं 3-0 असा विजय मिळवला. पहिल्या हाफमधील पहिल्या मिनिटातच महेंद्र गायकवाड यानं 2 गुण मिळवले. यानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यानं 1 गुण मिळवला. पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड 3-0 अशा आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याच्या विरोधात सिकंदर शेख यानं गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सिकंदर शेख याला गुण मिळवण्यात अपयश आलं. यामुळं महेंद्र गायकवाड यानं मॅटवर होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मॅट विभागातील अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीर विजयी

मॅट विभागातील अंतिम फेरीची लढत सोलापूर शहरकडून खेळणाऱ्या जय पाटील  आणि नाशिककडून खेळणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. हर्षवर्धन सदगीर यानं जय पाटील याचा 10-0 असा पराभव केला.

या स्पर्धेच्या गादी विभागाच्या दुसर्‍या फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने धाराशिवच्या धीरज बारस्कर याचा 12 – 2 असा पराभव केला. नांदेडच्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या श्रेयस होळकर याचा 10 – 0 असा एकतर्फी पराभव केला. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने सांगलीच्या सत्पाल शिंदे याचा 10-0 असा पराभव केला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने अमरावतीच्या वेताळ शेळके याचा 8-1 असा पराभव केला. सोलापूरच्या जय पाटीलने चेतन रेपाळे (अहिल्यानगर) याच्याविरुद्ध प्रेक्षणीय लढतीत 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. लातूर जिल्ह्याच्या अक्षय मंगवडने कोल्हापूर जिल्ह्याच्या सुशांत तांबूळकवर 3-1 अशी मात केली. पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने धाराशिवच्या धीरज बारस्करला 12-2 अशा गुणांनी नमवले. अकोल्याच्या सिद्धांत गवईने गडचिरोलीच्या संग्राम पाटीलला 13-3 अशा फरकाने पराभूत केले, तर सातार्‍याच्या दिग्विजय जाधवने हिंगोलीच्या गजानन भोयरवर 10-0 असा दणदणीत विजय मिळवला.

माती विभागाच्या दुसर्‍या फेरीत हिंगोलीच्या सिकंदर शेख याने पुण्याच्या मनीष रायते 8-2 याचा असा प्रभाव केला. गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले याने नाशिकच्या बाळू बोडखे याचा 4-1 असा पराभव केला. सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने धाराशिवच्या शिवराज लोकरेचा 10-0 अशा फरकाने पराभव केला. रत्नागिरीच्या संतोष दोरवडविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्याच्या शुभम शिदनाळने 5-0 असा विजय मिळवला. पुणे जिल्ह्याच्या सागर देवकातेला सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने 10-0 अशा फरकाने पराभूत केले. नंदूरबारच्या शशिकांत जमाळेला अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने 6-0 अशा फरकाने पराभूत केले. 68 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ५ माजी महाराष्ट्र केसरी सहभागी झाले होते. मात्र, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर सिकंदर शेख अंतिम फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने विजेतेपद पटकावत डबल केसरी होण्याचा मान पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!