राजकीय

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हीच प्राथमिकता; चेतनसिंह केदार सावंत

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे हीच प्राथमिकता – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि उपचारासाठी खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा परिषद सोलापूरच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभेत सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी आरोग्य विभागाला याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेत झालेल्या या सभेच्या प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सभेचे प्रास्ताविक करत मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर जिल्ह्यातील विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला. सभेत माता-बाल संगोपन, लसीकरण, कुष्ठरोग निर्मूलन, क्षयरोग नियंत्रण तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची उपलब्धता यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांबाबत अधिक विश्वास वाटावा यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे केदार-सावंत यांनी नमूद केले.

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पालखी मार्गावरील दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि वैद्यकीय पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावीत, तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त करताना, कोणत्याही आरोग्य संस्थेतील सेवा कर्मचारीअभावी प्रभावित होऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, व्यंकटराव भालके, संगीता दुधाळ, संदीप टेळे, नागनाथ भोसले, श्रीमती सविता कोकाटे या समिती सदस्यांसह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भरदेणार, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणार, नागरिकांना गावपातळीवरच उत्तम उपचार मिळावेत. आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनादेण्यात आल्या. औषधसाठा, मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध ठेवाव्या, गोरगरिबांच्या आरोग्य हक्कासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. निरोगी सोलापूरसाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार असे स्पष्ट निर्देश आरोग्य समितीच्या सभेत सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!