नाझरेत शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात, सुमारे ४० लाखांचे नुकसान
रोख रक्कम, सोने-चांदी, घरगुती साहित्य जळाले; सुदैवाने जीवितहानी टळली

नाझरेत शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात, सुमारे ४० लाखांचे नुकसान
रोख रक्कम, सोने-चांदी, घरगुती साहित्य जळाले; सुदैवाने जीवितहानी टळली
सांगोला (प्रतिनिधी): नाझरे (ता. सांगोला) येथील रहिवासी रायाप्पा रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घराला मंगळवार (दि.१० मार्च) रोजी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या भीषण आगीत कपडे, भांडी, सोने-चांदी, रोख रक्कम, अन्नधान्य तसेच संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे ४० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेमुळे पाटील कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत, पंचायत समितीचे सदस्य अजय सरगर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नाझरे (ता. सांगोला) येथील रहिवासी रायाप्पा रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घराला मंगळवार (दि.१० मार्च) रोजी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या भीषण आगीत कपडे, भांडी, सोने-चांदी, रोख रक्कम, अन्नधान्य तसेच संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे ४० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी हरिश्चंद्र जाधव, गाव कामगार तलाठी राजेंद्र जाधव आणि पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. मनोज रायाप्पा पाटील यांनी डाळिंब विक्रीतून आलेली रोख रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. दरम्यान मंगळवारी शॉर्टसर्किट होऊन घराला अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की घरातील सर्व वस्तूंसह घराच्या वरती असलेले खांडे, दांडे व पत्रेही जळून खाक झाले.

सुदैवाने घरातील सर्व सदस्य वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पाटील कुटुंबीय, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझवण्याचे प्रयत्न केले. या आगीत टीव्ही, फ्रिज, एसी, पंखे व इतर अनेक विद्युत उपकरणे पूर्णपणे जळून खाक झाली. पाटील कुटुंबाची उपजीविका प्रामुख्याने शेतीवर असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या दुर्घटनेने कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पाटील कुटुंबाला तातडीने मदतीचा हात द्यावा, तसेच शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सध्या हे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.



