राजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप कमळ चिन्हावर लढवणार – चेतनसिंह केदार सावंत

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप कमळ चिन्हावर लढवणार – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा केला जाईल. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक घेतली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष हा कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्धार केला असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, वासूदचे उपसरपंच अनिल (बंडू) केदार, मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, राजू मगर, वसंत सुपेकर, राजश्री नागणे, उत्तम खांडेकर, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, एन. वाय. भोसले, प्रवीण चौगुले, डॉ.जयंत केदार, मधुकर पवार, मोहन मिसाळ, नगरसेविका सुजाता केदार सावंत, वैशाली झपके, शोभा फुले, तनुजा एरंडे, स्वाती मगर, संगीता चौगुले, अनिता बेले, वैजयंती देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ साधला पाहिजे, जुन्यांना विसरून चालणार नाही, नव्यांबरोबर जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. तरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने ते यश मिळू शकेल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजूट होत निवडणुका जिंकण्याचा निर्धार आजपासून करावा. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरण करून सज्ज होऊन कामाला लागावे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी. जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे. भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!