पीकपेरणी

जिल्ह्यात ५४ लाख मे.टन ऊसाचे गाळप, ४२ लाख ९९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ऊस गाळपात आघाडीवर

जिल्ह्यात ५४ लाख मे.टन ऊसाचे गाळप, ४२ लाख ९९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना ऊस गाळपात आघाडीवर

सांगोला (दिलीप घुले): यंदाच्या २०२५- २६ या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील १० सहकारी आणि १९ खाजगी अशा २९ साखर कारखान्यांनी १० डिसेंबर अखेर ५४ लाख ४२ हजार ०२५ मे.टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी ७.९० टक्के साखर उताऱ्याने ४२ लाख ९९ हजार १८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना तर सरासरी साखर उताऱ्यात अनगरचा लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज जिल्ह्यात आघाडीवर आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील १० सहकारी तर १९ खाजगी अशा २९ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. १० डिसेंबर अखेर १० सहकारी साखर कारखान्यांनी २४ लाख ९२ हजार १०९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून १९ लाख ५४ हजार ६३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ७.८४ टक्के राहिला आहे. तर १९ खाजगी साखर कारखान्यांनी २९ लाख ४९ हजार ९१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून २३ लाख ४४ हजार ५५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ७.९५ टक्के राहिला आहे.

संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा ९०,२८५ मे.टन गाळप,७१,६०० क्विंटल साखर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव १,०५,३३४ मे.टन गाळप,५६,९०० क्विंटल साखर, दि सासवड माळी शुगर माळीनगर १,५७,०५० मे.टन गाळप, १,२९,१२० क्विंटल साखर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर ४,०९,२५५ मे.टन गाळप, ३,७०,४७५ क्विंटल साखर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे १,६४,३४५ मे.टन गाळप, १,०५,२५० क्विंटल साखर, जकराया शुगर वटवटे १,७२,२२४ मे. टन गाळप, ८८,१५० क्विंटल साखर, श्री पांडुरंग श्रीपुर ३,७७,७४७ मे.टन गाळप, ३,३०,२२५ क्विंटल साखर, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स खामगाव, बार्शी १,३०,८७४ मे. टन गाळप,१,१०,९५० क्विंटल साखर, सिताराम महाराज खर्डी १,७४,६७५ मे.टन गाळप, १,४५,३५० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर आलेगाव १,५५,७३९ मे.टन गाळप, १,४१,२०० क्विंटल साखर, बबनराव शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी २,५२,६९० मे.टन गाळप, २,३३,८०० क्विंटल साखर, युटोपियन शुगर कचरेवाडी १,९८,८६६ मे.टन गाळप, १,१६,७०० क्विंटल, व्ही.पी.शुगर तडवळ अक्कलकोट २,३४,०३६ मे.टन.गाळप, १,८८,४५० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ ५२,९८१ मे.टन गाळप, ४८,६५० क्विंटल साखर, श्री संत कुर्मदास पडसाळी ५८,९३५ मे.टन गाळप, ३५,६३० क्विंटल साखर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे १,६५,६४० मे.टन गाळप, १,१६,५०० क्विंटल साखर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज ३,५३,२०५ मे.टन गाळप, ३,११,७०० क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे युनिट २ करकंब २,१८,४७९ मे.टन गाळप १,८४,४०० क्विंटल साखर, श्री.शंकर कारखाना सदाशिवनगर १,२१,९६९ मे.टन गाळप, ९३,०५० क्विंटल साखर, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर मंगळवेढा १,५९,१७५ मे.टन.गाळप, १,४४,५०० क्विंटल साखर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी १,६८,९५५ मे.टन गाळप, १,५०,२८५ क्विंटल साखर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज अनगर १,९२,००० मे.टन गाळप, १,८०,७०० क्विंटल साखर,  धाराशिव साखर कारखाना (सांगोला) वाकी शिवणे ८५,४७० मे.टन गाळप, ६७,११० क्विंटल साखर, विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे करमाळा १,४४,२९४ मे.टन गाळप, १,१९,४५० क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर ६,२२,५६६ मे.टन गाळप, ३,५८,९०० क्विंटल साखर, आष्टी शुगर आष्टी १,४७,९९३ मे.टन गाळप,१,२७,००० क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी १,६३,३४२ मे.टन गाळप,  १,३७,९५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!