गुढीपाडव्याचा गोडवा महागला! साखरगाठी-हारांच्या दरात ३०-४० टक्के वाढ
गुढीपाडव्याचा गोडवा मइराण-इस्रायल युद्धाचा चटका, ऐन गुढीपाडवा सणात सर्वसामान्यांना महागाईचा फटका

गुढीपाडव्याचा गोडवा महागला! साखरगाठी-हारांच्या दरात ३०-४० टक्के वाढ
इराण-इस्रायल युद्धाचा चटका, ऐन गुढीपाडवा सणात सर्वसामान्यांना महागाईचा फटका
सांगोला (प्रतिनिधी) : इराण-इस्रायल युद्ध आखातात सुरू असले तरी त्याचे चटके सर्वसामान्य भारतीयांना बसत आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांना मोठे महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किमती गगनाला भिडल्याचे चित्र दिसत आहे. मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुढीपाडवा सणात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका साखर गाठी हार तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही बसला आहे.
मराठी नववर्षाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखरगाठी आणि साखरेच्या हारांना मोठी मागणी असते. मात्र यंदा वाढत्या महागाईमुळे गुढीपाडव्याचा गोडवा महागला असून साखरगाठी, साखरहार आणि जावईहार यांच्या दरात तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना यंदाच्या सणात महागाईचा मोठा फटका बसत आहे. आखातातील युद्धामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. साखर कारखान्यांसह शेतक-यांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला स्वस्त झाला. इराण-इस्रायल युद्धामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनेक शहरांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे समोर येत आहे.
सांगोला शहरासह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये गुढीपाडव्याच्या तयारीला वेग आला आहे. गुढी उभारणीसाठी लागणारे साखरेचे हार, साखरगाठी, साखरेचे दागिने, तसेच जावईहार खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी वाढलेल्या दरामुळे अनेकजण पर्याय शोधताना दिसत आहेत. यंदा साखरेचे वाढलेले दर, मजुरीतील वाढ, इंधन खर्च आणि गाठी तयार करणाऱ्या पारंपरिक कारागिरांची कमतरता यामुळे हारांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
बाजारात यंदा साखरगाठींचे भाव साधारणपणे १२० ते १५० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. मोठ्या आकाराचे हार, सजावटीचे साखर दागिने आणि जावईहार यांचे दरही वाढले असून काही ठिकाणी ग्राहकांना खारीक-खोबरे, सुका मेवा किंवा प्लास्टिक सजावटीचे हार पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कच्च्या मालाच्या किमती दुप्पट-तिपटीने वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे मागणी असूनही पुरवठा मर्यादित राहिला आहे. परिणामी बाजारात साखरगाठी कमी प्रमाणात दिसत आहेत.
गुढीपाडव्याला गुढीला साखरहार घालणे, साखरगाठींचा नैवेद्य दाखवणे ही परंपरा असल्यामुळे दरवाढ झालेली असली तरी खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कायम आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही साखरेचे हार, गाठी आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चांगलीच लगबग पाहायला मिळत आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असुन त्याचा फटका साखर गाठी हार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना ही बसला आहे.



