कृषी सल्लापीकपेरणी

पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांनीच भरले अर्ज, ६५ हजार हेक्टरवरील पिक विमा संरक्षित

 

पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

 

जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांनीच भरले अर्ज, ६५ हजार हेक्टरवरील पिक विमा संरक्षित

सांगोला (प्रतिनिधी): प्रधानमंत्री पीकविमा योजनेत रब्बी हंगामात पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यंदा २०२५-२६ रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून जेमतेम ४८ हजार १९४ शेतकऱ्यांनी ६५ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रातील पीकविमा संरक्षित केला आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी २ कोटी २९ लाख ९ हजार ३४३ रुपयांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला आहे.

 

तालुका शेतकरी अर्ज   हेक्टर रक्कम
कर्जदार बिगर कर्जदार  एकूण विमा शेतकरी विमा हप्ता
अक्कलकोट 2,509 147 4,858 5,005 4,138.11 14,22,310
बार्शी 12,091 626 21,628 22,254 18,177.16 64,50,519
करमाळा 3,867 119 7,336 7,455 5,559.65 22,75,887
माढा 3,469 166 7,051 7,217 4,242.77 15,76,344
माळशिरस 2,556 90 5,339 5,429 2,804.81 9,90,149
मंगळवेढा 5,627 282 11,150 11,432 8,908.28 30,80,305
मोहोळ 1,789 131 2,607 2,738 2,320.22 8,29,683
पंढरपूर 311 91 426 517 286.71 1,02,797
सांगोला 13,141 453 25,993 26,446 15,183.12 46,08,042
उत्तर सोलापूर 1,608 44 2,762 2,806 2,311.46 8,86,955
दक्षिण सोलापूर 1,226 95 2,371 2,466 1,922.81 6,86,352
एकूण 48,194 2244 91,521 93,765 65,855.10 22909343

 

शासनाने मागील हंगामात लागू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत यंदा पूर्णतः बदल करण्यात आला. नवीन नियमावली जाचक असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी लाखोची संख्या होती. २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत होती. शेतकरी केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता राज्य सरकारनं ही योजना बंद केली आहे. आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, रबी हंगामासाठी १.५ टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे.

एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती. नवीन बदलांनुसार, यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ई-पीक पाहणी बंधनकारकयासोबतच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या पिकांची नोंद पीक पाहणी अंतर्गत करण्यात आली आहे त्याच पिकांसाठी विमा उतरवता येणार आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पीक विमा भरणारे शेतकरी

अक्कलकोट- २ हजार ५०९

बार्शी १२ हजार ०९१

करमाळा ३ हजार ८६७

माढा ३ हजार ४६९

माळशिरस २ हजार ५५६

मंगळवेढा ५ हजार ६२७

मोहोळ १ हजार ७८९

पंढरपूर ३११

सांगोला १३ हजार १४१

उत्तर सोलापूर १ हजार ६०८

दक्षिण सोलापूर १ हजार २२६

एकूण : ४८ हजार १९४

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!