स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत – सोनियाताई गोरे
स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत - सोनियाताई गोरे

स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत – सोनियाताई गोरे
मातृशक्ती आणि दुर्गाशक्ती पुरस्कार वितरणाचा सोहळा
दिमाखात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): जिथे स्त्रियांचा सन्मान करण्यात येतो तिथे देवता वास करतात. स्त्रियांची शक्ती महान असून ज्यांनी त्यांची पूजा केली त्यांच्या ताब्यात या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र दिला. समाज परिवर्तनाचा खरा वारसा आजपर्यंत स्त्रियांनीच जपला असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याचे पवित्र कार्य अनिलभाऊ इंगवले साहेबांचे नेतृत्वाखाली हा सूर्योदय परिवार करत आहे. आपले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून सबंध महाराष्ट्रासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी सदस्या सोनियाताई गोरे यांनी व्यक्त केले.

अनिलभाऊ इंगवले आणि त्यांच्या चार मित्रांनी अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक ऋण व्यक्त करण्याची भावना मनात ठेवून अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणाऱ्या या सूर्योदय परिवाराच्या सर्व प्रकारच्या व्यवसायाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ कायम राहील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी रुपमती दीपकराव साळुंखे पाटील, नूतन सभापती पूनमताई इंगवले, पंचायत समितीच्या सदस्या राणीताई पाटील, नगरसेविका सुजाताताई केदार, सुप्रियाताई इंगवले तसेच सूर्योदय अर्बनच्या व्हा. चेअरमन ज्योतीताई भगत, संचालिका मीनाक्षीताई दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन अर्चनाताई इंगवले यांनी आपल्या प्रास्ताविकात सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेले विविध उपक्रमांची माहिती आणि जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत उत्तुंग कर्तुत्व असलेल्या अनेक महिलांना पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आमच्या सूर्योदय फाउंडेशनची उंची खर तर अशा पुरस्कारामुळे आणखी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी एल के पी मल्टीस्टेटच्या संचालिका सुरेखाताई लवटे, रुपमती साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले तसेच हभप पांडुरंग ताटे, पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने सांगोला महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, माता बालक प्रतिष्ठानच्या प्रमुख संजीवनीताई केळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या समाजभूषण सखुबाई वाघमारे इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त करताना एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय महिला अर्बन, सूर्योदय अर्बन तसेच सूर्योदय दूध विभाग आणि सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतन अशा व्यवसायाच्या आणि संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यात आपल्या कर्तुत्वाची भरारी घेत असताना दुसऱ्या बाजूला व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य उभा करत महिला दिन सारखे अत्यंत देखने कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे विशेष कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्रातील नामवंत हास्यसम्राट आणि या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते संभाजी यादव यांनी अत्यंत विनोदी शैलीत सर्वांना संस्काराचे धडे दिले. विविध वाद्यांचे, प्राण्यांचे, चित्रपटातील अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढत सुमारे तासभर उपस्थितांची हसता हसता अक्षरशः पुरेवाट केली. दोन्ही पायांनी पूर्णतः अपंग असताना देखील समाजातील सूक्ष्म गोष्टींचे निरीक्षण करून केलेले जीवनोपयोगी प्रबोधन सर्वांच्या मनाला भावले. चूल आणि मुले याच्या पलीकडे जाऊन आकाशाला गवसणी घालणारे कर्तुत्व गाजवणाऱ्या रणरागिनी महिलांना दुर्गाशक्ती आणि बलशाली भारताच्या विकासात मोलाचे योगदान देणारी पिढी निर्माण करणाऱ्या आदर्श मातांना मातृशक्ती या पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून व्यापक कार्य करणाऱ्या संजीवनीताई केळकर, महिला सूतगिरणीच्या विद्यमान चेअरमन आणि माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, महिला सूतगिरणीच्या जवळपास तीन तपे चेअरमन पद भूषवणाऱ्या श्रीमती विमलताई कुमठेकर, सुमारे 55 वर्षापासून कठीण परिस्थितीशी झगडत व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्रीमती सखुबाई वाघमारे, महिलांच्या संवेदना आणि व्यथा समाजासमोर मांडत सातत्याने प्रबोधन करणाऱ्या श्रीमती सुवर्णाताई इंगवले, पुढच्या अखंड पिढीला शिक्षणाने सुजाण आणि सुशिक्षित करून त्यांच्याकडून व्यापक कार्य उभा करणाऱ्या आदर्श माता श्रीमती निर्मला रामदास भोसले, तसेच श्रीमती उर्मिला विनायक इंगवले, संजीवनी अविनाश माने, मंगल येसाप्पा माने, स्नेहा धनंजय डोंगरे, नीता मोहनराव पवार, सिंधुताई मोहन कोळी, श्रीमती सोनाली शत्रुघ्न माळी, श्रीमती स्वप्नाली प्रमोद भगत, जनाबाई धोंडीबा थोरबोले, मेघाली सिताराम काकडे, समाबाई मल्हारी लवटे, मनीषा जगन्नाथ कसगावडे, दमयंती दत्तात्रय पाटील, वैशाली बाळासाहेब भोसले, श्रीमती वंदना शरदचंद्र पाटणे, सुनंदा कुंडलिक खांडेकर, बेबीनंदा दगडू पवार, अरुणादेवी अमरसिंह देशमुख, सुनिता विष्णू बोंगे, नेहा मिलिंद श्रोत्री, मनीषा शिवाजी नागणे, अंजली हर्षल बनसोडे, सुनीता बाळासाहेब वाघमोडे, श्रद्धा नवनाथ सपाटे, सुवर्णा दत्तात्रय शेडसाळे, अमृता अरविंद कुलकर्णी, सखुबाई भारत हेंबाडे, ताराबाई बळीराम शिंदे, चंद्रभागा रामदास घाडगे, वर्षाराणी गणपत मोरे, रत्नमाला संभाजी कदम, सखुबाई बाळासाहेब सावंत, रेखा आबासो माने, सुनीता शंकर मासाळ, कविता कृष्णा जानकर, विजया सदाशिव साळुंखे, स्मिता अमोल खंडागळे, लक्ष्मी अनिल कर्चे, निळाबाई वसंतराव पाटील, सुलभा बिरा वाघमोडे,अश्विनी सचिन लेंडवे, स्वाती ज्ञानेश्वर रोकडे, राणी प्रताप काळे आणि विद्या पांडुरंग ताटे इत्यादी रणरागिनींना सोनियाताई गोरे आणि मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, मायेची शान, सन्मानाची ट्रॉफी आणि मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक आणि एल के पी मल्टीस्टेट चेअरमन अनिलभाऊ इंगवले तसेच सह संस्थापक सर्वश्री डॉ बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी तसेच नामवंत वक्ते आणि शिक्षक नेते सुरेश पवार गुरुजी, डॉ शिवराज भोसले, प्रशांत पाटील, सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल काळुंगे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड उपस्थिती, उत्कृष्ट आसन व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था आणि व्याख्यानाची मेजवानी यामुळे हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय झाला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.



