कृषी सल्ला

कृषी सल्ला – एकात्मिक कीड व्यवस्थापन

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत, गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक कीडनाशकांच्या वापरामध्ये वाढ होत गेली आहे. पिकामध्ये कीड दिसली की आर्थिक नुकसानीची पातळी वगैरे फारसा विचार न करता रासायनिक नियंत्रणाचे उपाय वापरले जातात. याचे विपरीत परिणाम –

१. रासायनिक कीडनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अनघाच्यामध्ये दिसत असून, त्याचे परिणाम मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत, परदेशातील कीडनाशक अवशेषाबाबतचे धोरण कडक असून, असे अवशेष आढळल्यामुळे शेतीमाल नाकारला जात आहे.

२. सततच्या वापरामुळे किडींची रसायनाविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढली आहे.

३. पिकावरील किडींचे नैसर्गिक शत्रू सततच्या फवारणीमुळे नष्ट झाल्याने किडींवरील नैसर्गिक अंकुश नाहिसा होत आहे. परिणामी पूर्वी अल्प प्रमाणात नुकसान करणाऱ्या किडीही रौद्ररूप धारण करताना दिसत आहेत.

४. परागीभवन करणाऱ्या मधमाश्या, बंबल बी अशा शेतीसाठी आवश्यकत कीटकांची संख्या कमी होत आहे. या ऐवजी शेतीमध्ये पिकांचे निरीक्षण करून योग्य वेळी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय वापरणे आवश्यक आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती :

१. मशागतीय नियंत्रण पिक उत्पादनासाठी शेतकरी वापरात असलेल्या तंत्रज्ञानाचा कीड व्यवस्थापनासाठी उपयोग करणे याला मशागतीय पद्धती म्हणतात. यामुळे पिकांना पोषक व किडींना प्रतिकूल वातावरण निर्माण होते. उदा. हिरवळीचे खत व शेणखतांचा वापर, उन्हाळ्यात जमिनीवर खोलवर मशागत, वेळेवर पेरणी, निरोगी बी-बियाणे वापरणे, बीज प्रक्रिया, बियाण्याचे प्रमाण शिफारशीपेक्षा १० ते २० टक्के जादा, माती परीक्षण अहवालानुसार खतांच्या मात्र शिफारशी, शेण, पालापाचोळा, पिकाचे अवशेष कुजविण्यासाठी अणुजीवांचा वापर, सेंद्रिय खतांचा तसेच जैविक खतांचा वापर, आंतर व मिश्र पिके, पिकाची फेरपालट, गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या, मातीची भर, निंदणी, आंतरमशागत, वेळेवर पिकाची काढणी व पिकाचे अवशेष शेतातच कुजविण्याची क्रिया केल्याने निसर्गतः किडींचे नियंत्रण होत असते.

२. यांत्रिक पद्धती: विविध यंत्र किया उपकरणे आणि मानवी शक्तीचा वापर करून किडींना मारणे किंवा किडींना खाद्यापर्यंत पोहचू न देणे याला यांत्रिक पद्धती म्हणतात. पिकावरील पाने खाणा-या व फळे पोखरणा-या अळ्यांचे नियंत्रणासाठी ही प्रभावी पद्धत आहे. उदा. हाताने किडी जमा करणे, कीडग्रस्त भाग नष्ट करणे, पिकावरील अळ्या/किडी गोळा करून केरोसीन मिश्रित पाण्यात टाकून मारणे, जाळीने किडी पकडणे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावणे, पक्षी थांब्यांचा वापर, धान्य चाळणे, चिकट सापळे लावणे, खोडाभोवती चिकट पदार्थ किंवा पत्रा लावणे, शेताभोवती चर खोदणे, फळांना झाकणे, शेतात दूर करणे, आग निर्माण करणारे यंत्र तसेच पक्षांना हाकलण्यासाठी यंत्र वापरणे,

३. भौतिक पद्धती: वातावरणाचे अजैविक घटक जसे तापमान, आर्द्रता इ. मध्ये बदल घडवून करण्याला भौतिक पद्धती म्हणतात. उदा. धान्य वाळविणे, उष्ण पाण्याची प्रक्रिया, साचलेले पार लाकडाचा भुसा किंवा राखेचा वापर, कमी तापमानात वस्तू ठेवणे, प्रकाश व ध्वनी यांचा वापर करणे.३. भौतिक पद्धती पातावरणाचे अजैविक घटक जसे तापमान, आर्द्रता इ. माये बदल घडवून कीड व्यवस्थापन करण्याला भौतिक पद्धती म्हणतात. उदा. धान्य वाळविणे, उष्ण पाण्याची प्रक्रिया, साचलेले पाणी काढून टाकणे. लाकडाचा भुसा किंवा राखेचा वापर, कमी तापमानात वस्तू ठेवणे, प्रकाश व ध्वनी यांचा वापर करणे.

४. जैविक पद्धती: किडींच्या नैसर्गिक शत्रूद्वारे व्यवस्थापनाला जैविक पद्धती म्हणतात, पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करताना त्या भागातील वातावरण, पिक पद्धती आणि महत्वाच्या उपद्रवी किडींच्या जीवनक्रमाबाबत अभ्यास करून इतर प्रदेशात तत्सम वातावरण आणि पिक पद्धती असलेल्या भागात सदर कीड कोणत्या कारणांनी नियंत्रणात आहे, हे शोधणे गरजेचे असते. किडींचे नैसर्गिक शत्रूनिसर्गतः किडींची संख्या नियंत्रित करत असल्यास असे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या किडीचा उद्रेक झालेल्या भागातील पिकावर त्यांचे प्रसारण करण्यात येते. अशाप्रकारे किडीचे नैसर्गिक शतू वातावरणात प्रस्थापित झाल्यास ते किडींची संख्या कित्येक वर्ष आर्थिक नुकसान संकेत पातळीखाली ठेवतात.

५. कायदेशीर पद्धती: कीड व्यवस्थापनासाठी विविध कायदे तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे,

६. रासायनिक पद्धती किटक नाशकांचा वापर करून कीड व्यवस्थापन करणे याला रासायनिक पद्धती म्हणतात. उदा. क्लोरपायरीफॉस, सायपरमेश्रीन, स्पिनोसेंड इ. केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती यांचे शिफारशी नुसार कीडनाशकांचा वापर करावा, शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी, कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचावेत, कीडनाशक फवारणीपूर्वी किडींची संख्या/आर्थिक नुकसान पातळी विचारात घेवून आवश्यक असेल तरब फवारणी करावी.

एकात्मिक रोग व्यवस्थापन

पिकांवर येणा-या रोगांसाठी बुरशी, अणुजीव, विषाणू, मायकोप्लाजमा आणि स्पायरोप्लाजमा कारणीभूत आहेत. ज्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते अशा रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अवलंब केल्यास पिकांचे रोगापासून होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे अशी पद्धत कि ज्यामध्ये विविध पद्धतींचा म्हणजे मशागतीय, रासायनिक, अनुवांशिक, जैविक पद्धतींचा वापर करून रोगाचे नियंत्रण करून हानिकारक बुरशी नाशकांचा वापर कमीत कमी प्रमाणात करता येतो.

अ. मशागतीद्वारे रोग व्यवस्थापन पिकांवरील रोग व्यवस्थापनाची ही अतिशय महत्वाची पध्दत असून या पध्दतीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर रोगांचे नियंत्रण करता येते. खाली दिलेल्या वेगवेगळ्या मशागतीय पध्दतींचा वापर करता येतो.

१. शेत पडीक ठेवणे: काही काळ पिके न घेता शेत जमीन पडीक ठेवल्याने पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. परंतु अशा जमिनीत तणे वाढू दिली तर परिणाम होत नाही. कारण या तणांवर रोगकारक जिवाणू पोसले जातात. कोरड किंवा शेतात पाणी सोडून काही काळपर्यंत जमीन पाण्याखाली ठेवली तर या जमिनीतील रोगकारक बुरशी व इतर जिवाणु प्राणवायू न मिळाल्यामुळे मरतात. त्यामुळे रोगकारक बुरशीच्या बिजाणूंची (स्क्लेरोशियम, पिमियम, अल्टरनेरिया) संख्या कमी होवून रोगांचे नियंत्रण होते.

२. जमिनीची खोल नांगरणी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर असणारे रोगकारक जंतू जमिनीत खोल गाडले जातात किंवा पृष्ठभागावर उघडे पडतात व प्रखर उन्हात तापल्याने ते मरतात. खोल नांगरट केल्याने भुईमूग आणि हरभ-याच्या खोड कुजव्या रोगास कारणीभूत स्क्लेरोशियम रोल्फसायचे रोगग्रस्त धसकटातील स्क्लेरोशिया बिजाणू नाश पावतात. तसेच केवडा रोगकारक बुरशीचे लैंगिक बिजाणू (स्क्लेरोस्पोरा ग्रामिनीकोला, पेरेनोस्पोरा, तसेच अलबुगों कॅनडिडाचे) कमी झाल्यामुळे, बाजरीवरील गोसावी, कोबीवरचा केवडा आणि पांढरा तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

३. पिकांची फेरपालट शेतात सतत एकच पीक घेतल्यास जमिनीतील अन्न घटक व सूक्ष्म द्रव्ये झपाट्याने कमी होतात
त्यांचा असमतोल होतो व पिकावर येणान्या ठराविक रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढतब जातो. पिकाच्या फेरपालटामुळे त्या पिकावर येणाऱ्या ठराविक रोगाचे जिवाणू दुसऱ्या पिकावर उपजिवीका करू न शकल्यामुळे अशा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. उदा. कापूस, ज्वारी, भुईमूग या पिकांचा फेरबदल केल्यामुळे तूर, वाटाणा व कपाशीवरील मर रोगाचे नियंत्रण होते.

४. मिश्र / आंतर पिकेः मिश्र पिके आणि आंतरपिके घेतल्यास रोगाचा प्रसार होण्याकरिता अनुकूल परिस्थिती मिळत नाहीं. तूरीचे आंतरपीक ज्वारीमध्ये घेतले तर तुरीला मर (फुजारियम उडम) रोगाची लागण कमी होते.

५. पेरणीच्या वेळेत बदल करणे योग्य वेळी म्हणजेच पिकांची पेरणी लवकर किंवा उशिरा केल्याने रोगकारक जिवाणूंची लागण होण्याची पिकाची नाजूक अवस्था निघून जाते.

६. पूरक सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळणे: जमिनीत सेंद्रिय पदार्थ (तेलबियाची पेंड, गव्हाचे काड, उसाच्या पाचटाचे कंपोस्ट खत घातल्याने जमिनीतील रोगकारक जिवाणूचे नियंत्रण होते

७. शेतातील स्वच्छता मोहिम शेतातील रोगग्रस्त झाडे, रोगट पिकांचे अवशेष, रोगग्रस्त पिकांची गळून पडलेली पाने, फांद्या, फळे. तण, कचरा इ. जाळून टाकावित म्हणजे रोगाचा निरोगी झाडावर प्रसार होत नाही,

८. जमिनीवर आच्छादनाचा वापर बाष्पीभवनामुळे जमिनीतील ओल उडून जाते ती थोपवून धरण्यासाठी शेतातील वाळलेले गवत, तण, पालापाचोळा, उसाचे पाचट, काडीकचरा, धसकटे, तुरीच्या काजवा इ. पिकांच्या दोन ओळीत जमिनीत पसरावे. या आच्छादनाच्या वापरामुळे ज्वारीवरील खडखड्या रोगांचे नियंत्रण होते.

९. खतांचा प्रमाणशीर वापर पिकांना योग्य अन्नद्रव्ये दिली तर पिके निरोगी वाढतात. स्फुरद आणि पालाशची मात्रा
समतोल प्रमाणात दिली तर झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते नत्रयुक्त खताची मात्रा जास्त दिल्यास भाताचा कडाकरपा रोग वाढतो आणि मर (फ्युजारियम्) व रोपे कोलमडणे रोग (पिचियम) फोफावती सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेही पिके रोगास बळी पडतात. उदा. मैग्नेशियमच्या कमतरतेमुळे मर रोग वाढतो तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे डाळवर्गीय पिके मररोगास बळी पडतात.

१०. झाडांची योग्य संख्या दोन ओळीतील किंवा झाडांमधील अंतर वाढविले तर रोपे कोलमडणे, करपा व मर इत्यादी रोगांची लागण कमी होते.

११. जमिनीचे सोलरायझेशन: पांढऱ्या पॉलिथिन कापडाचे पूर्ण आच्छादन करुन व वाफ्याच्या सर्व बाजू बंद करुन सूर्याच्या प्रखर उन्हात एक महिना ठेवल्यास बटाट्याच्या काळ्या स्कर्फ (रायझोक्टोनिया सोलेंनी) रोगाचे नियंत्रण करता येते.

ब. रोगप्रतिकारक जातींचा वापर रोग प्रतिकारक जातीची लागवड करणे ही एक उत्तम व कमी खर्चाची पध्दत आहे. परंतु सर्व पिकांच्या रोगप्रतिकारक जाती उपलब्ध नाहीत, त्यासाठी सतत संशोधन करून रोगप्रतिकारक जातींची संकर पध्दतीने किंवा निवड फदतीने निर्मिती केली जाते. पिकांच्या वाणांमध्ये ज्याप्रमाणे रोगकारक नव्या अनुवांशिक बदलाच्या सहाय्याने नवी जात निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे रोगकारक जिवाणूंमध्येही बदल होऊन त्यांच्या नवीन प्रजाती तयार होतात आणि एकदा रोगप्रतिकारक म्हणून संशोधित केलेली पिकाची जात या रोगकारक जिवाणूंच्या प्रजातींना काही काळाने बळी पडतात, त्यामुळे नवीन रोगप्रतिकारक जात शोधण्याचे काम चालूच ठेवावे लागते,

क. रोगांचे रासायनिक व्यवस्थापनः सर्वसाधारणपणे पिकांच्या रोग नियंत्रणासाठी वापरली जाणारी मदत म्हणजे रासायनिकांचा बुरशीनाशक/जिवाणूनाशक / कीटकनाशक) वापर करणे, पिकांच्या महत्वाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास किंवा बुरशीनाशके रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच रोगाचा प्रसार होण्याअगोदर पिकांवर फवारणीमुळे पिकाचे रोगापासून संरक्षण होते. सध्या वनस्पतीच्या पेशीमधून आंतरप्रवाहीत होऊन कार्य करणारी बुरशीनाशके व प्रतिजैविके (अँन्टिबॉयोटिक्स) बाजारात उपलब्ध असून त्यांचा उपयोग पिकांच्या रोगनियंत्रणासाठी केला जातो.

(तांत्रिक माहिती स्रोत: म.फु.कृ.वि. कृषीदर्शनी, व.ना.म.कृ.वि., कृषी दैनंदिनी, कृषी विभाग)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!