सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ४ लाख मे.टन ऊसाचे गाळप
८८ लाख क्विंटल साखर उत्पादन; पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात अव्वल

सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ४ लाख मे.टन ऊसाचे गाळप
८८ लाख क्विंटल साखर उत्पादन; पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात अव्वल
सांगोला (दिलीप घुले): सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या २०२५-२६ गाळप हंगामात साखर उद्योगाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी आणि २१ खाजगी अशा ३३३ साखर कारखान्यांनी ८ जानेवारी २०२६ अखेर १ कोटी ०४ लाख ९३ हजार २१५ मे.टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी ८.३९ टक्के साखर उताऱ्याने ८८ लाख ०५ हजार ४६५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपाच्या बाबतीत पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात आघाडीवर असून, तर सरासरी साखर उताऱ्यात अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज (१०.३९ टक्के) आघाडीवर आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील १२ सहकारी तर २१ खाजगी अशा ३३ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. ८ जानेवारी २०२६ अखेर १२ सहकारी साखर कारखान्यांनी ४५ लाख १३ हजार ६११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ३७ लाख ९० हजार २१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ८.४० टक्के राहिला आहे. तर २१ खाजगी साखर कारखान्यांनी ५९ लाख ७९ हजार ६०४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५० लाख १५ हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.३९ टक्के राहिला आहे.
संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा 1,90,200 मे.टन गाळप,1,77,700 क्विंटल साखर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव 2,61,314 मे.टन गाळप, 1,51,500 क्विंटल साखर, जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव 4,12,620 मे.टन गाळप, 2,89,650 क्विंटल साखर, दि सासवड माळी शुगर माळीनगर 2,74,220 मे.टन गाळप, 2,28,800 क्विंटल साखर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर 6,90,805 मे.टन गाळप, 6,63,900 क्विंटल साखर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे 2,93,566 मे.टन गाळप, 1,98,000 क्विंटल साखर, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे 2,98,805 मे. टन गाळप, 2,85,420 क्विंटल साखर, जकराया शुगर वटवटे 2,49,467 मे. टन गाळप, 1,45,450 क्विंटल साखर, श्री पांडुरंग श्रीपुर 639099 मे.टन गाळप, 5,79,590 क्विंटल साखर, येडेश्वरी ऍग्रो प्रॉडक्ट्स खामगाव, बार्शी 2,14,984 मे. टन गाळप,1,92,200 क्विंटल साखर, सिताराम महाराज खर्डी 3,25,936 मे.टन गाळप, 2,81,900 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर आलेगाव 2,61,637 मे.टन गाळप, 2,57,500 क्विंटल साखर, बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी 4,26,980 मे.टन गाळप, 4,42,900 क्विंटल साखर, युटोपियन शुगर कचरेवाडी 3,18,044 मे.टन गाळप, 2,11,400 क्विंटल साखर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी 1,22,355 मे.टन गाळप, 1,15,100 क्विंटल साखर, व्ही.पी.शुगर तडवळ अक्कलकोट 4,30,062 मे.टन. गाळप, 3,85,550 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ 1,51,726 मे.टन गाळप, 1,38,350 क्विंटल साखर, श्री संत कुर्मदास पडसाळी 1,03,725 मे.टन गाळप, 71,840 क्विंटल साखर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे 2,73,585 मे.टन गाळप, 2,12,650 क्विंटल साखर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज 5,91,760 मे.टन गाळप, 5,44,900 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे युनिट २ करकंब 3,53,234 मे.टन गाळप 3,17,450 क्विंटल साखर, श्री.शंकर कारखाना सदाशिवनगर 1,99,011 मे.टन गाळप, 1,58,300 क्विंटल साखर, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर मंगळवेढा 2,82,640 मे.टन.गाळप, 2,81,400 क्विंटल साखर, लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज बीबीदारफळ 1,57,212 मे. टन गाळप, 96,140 क्विंटल साखर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी 3,75,324 मे.टन गाळप, 3,03,005 क्विंटल साखर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज अनगर 3,68,450 मे.टन गाळप, 3,79,650 क्विंटल साखर, धाराशिव साखर कारखाना (सांगोला) वाकी शिवणे 1,44,690 मे.टन गाळप, 1,24,610 क्विंटल साखर, विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे करमाळा 2,63,547 मे.टन गाळप, 2,43,300 क्विंटल साखर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर 10,26,141 मे.टन गाळप, 6,27,800 क्विंटल साखर, आष्टी शुगर आष्टी 2,60,310 मे.टन गाळप, 2,27,350 क्विंटल साखर, भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी 2,80,161 मे.टन गाळप, 2,55,300 क्विंटल साखर, इंद्रेश्वर शुगर उपळाई 77,819 मे.टन गाळप, 93,260 क्विंटल साखर, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर 1,53,785 मे टन गाळप, 1,23,600 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र
चांगला ऊसपुरवठा, साखरेचा समाधानकारक उतारा आणि गाळपाचा वेग पाहता यंदाचा हंगाम शेतकरी, साखर कारखाने व जिल्ह्याच्या अर्थकारणासाठी सकारात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात उर्वरित हंगामात गाळप व उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



