कृषी सल्ला

इच्छुकांनो लागा तयारीला…प्रभाग निहाय आरक्षण जाहीर..!

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

इच्छुकांनो लागा तयारीला…प्रभाग निहाय आरक्षण जाहीर..!

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

सांगोला (प्रतिनिधी): गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. प्रशासकीय पातळीवर या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे.

६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात राज्यातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. तर ८ ऑक्टोबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने नगरपालिका निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. तसेच बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सांगोला नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे.

प्रभाग १
अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग २
अ.अनुसुचित जाती
ब.सर्वसाधारण महिला

प्रभाग ३
अ.अनुसुचित जाती महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग ४
अ.सर्वसाधारण महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग ५
अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब.सर्वसाधारण महिला

प्रभाग ६
अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग ७
अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब.सर्वसाधारण महिला

प्रभाग ८
अ.अनुसुचित जाती महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग ९
अ..नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब.सर्वसाधारण महिला

प्रभाग १०
अ.सर्वसाधारण महिला
ब.सर्वसाधारण

प्रभाग ११
अ.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब.सर्वसाधारण महिला
क.सर्वसाधारण

आता आरक्षणसोडती नंतर नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय पदाधिकार्‍यांनी पूर्व तयारी सुरु केली आहे. दरम्यान, काही उच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक मंडळी सज्ज झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत येथे झालेल्या सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी संपून तब्बल चार वर्षांहून अधिक काळ लोटला, मात्र निवडणुका न झाल्याने इच्छुकांची चांगलीच कुचंबना झाली होती, मात्र येत्या एक दोन महिन्यात या निवडणुका घेण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ही माहिती सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यापर्यंत पोहोचल्याने यादृष्टीने जय्यत तयारी सुरू करण्याचे आदेश त्यांना आले आहेत. नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणांवर या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणानुसार अनेक इच्छुक उमेदवारांना आता त्यांच्या राजकीय भविष्यासाठी नवी दिशा ठरवावी लागणार आहे. सोयीचा ठरणारा वार्ड निश्चित करून त्या भागातील जनसंपर्क वाढवण्याचे काम विविध माध्यमातून सुरू आहे.

दरम्यान दोन वेळा प्रभाग रचना व आरक्षण सोडती निघूनही निवडणुका जाहीर होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती. दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या विचारात असलेल्यांचीही अडचण झाली आहे. अनेकांचे पक्ष प्रवेश रखडल्याने राजकीय स्तरावर नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. राजकीय उलथापालथ व आर्थिक गणिते बिघडल्याने इच्छुकांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीवरही पाणी फिरले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय स्थिती कमालीची बदलल्याने आगामी निवडणूक कोणत्या पक्षाच्या व आघाडीच्या माध्यमातून लढवावी यासाठी इच्छुकांची दमछाक होत आहे. निवडणुकीत आपणच उमेदवार असल्याचे डोहाळे नव्या चेहऱ्यांना लागले असून त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी करून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र नगरपालिका क्षेत्रात पहावयास मिळत आहे.

इच्छुक उमेदवार सामान्य नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून आपण अमूक पक्षाचे उमेदवार असल्याचे भासवून देत आहेत. सामान्यांच्या अडीअडचणी सोडविणे कुणास मदत करणे, लग्न समारंभ वाढदिवसात हजेरी लावणे आदींच्या माध्यमातून गल्लीबोळात फिरताना हे इच्छुक उमेदवार सामान्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची करण्याकरिता विविध पक्षाचे नेते अशा मालदार उमेदवारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे वेळेवर कोणाला तिकीट मिळाले नाही तर वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारीसुद्धा असल्याचे इच्छुकांमध्ये बोलले जात आहे. परिसरात विविध समस्या असल्याने त्या कशा सोडवाव्यात याचा अभ्यास करुन नगरवासीयांना पाणी, रस्ते, पथदिवे यासह विकास करण्याचे दिव्यस्वप्न दाखवून आतापासूनच काहींनी प्रचारात सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!