राजकीय

कडलासच्या सरपंचपदी सुनीता भजनावळे तर अचकदानी गावच्या सरपंचपदी राधाबाई कोळेकर यांची निवड

कडलासच्या सरपंचपदी सुनीता भजनावळे तर अचकदानी गावच्या सरपंचपदी राधाबाई कोळेकर यांची निवड

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाणाऱ्या कडलास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता पांडुरंग भजनावळे यांची तर अचकदानी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधाबाई अंबादास कोळेकर यांची निवड करण्यात आली.


सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर दोन्ही गावच्या सरपंचांनी मिरवणुकीने सांगोला येथील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कडलासच्या नूतन सरपंच सुनीता पांडुरंग भजनावळे व अचकदानी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच राधाबाई अंबादास कोळेकर यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी नूतन सरपंचांना शुभेच्छा देताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कडलास आणि अचकदानी या दोन्हीही गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरि सहकार्य करू अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना दिली. कडलास आणि अचकदानी या दोन्ही गावांवर नेहमीच आपले विशेष प्रेम आणि लक्ष राहिले आहे. पक्ष, पार्टी, जात धर्म न पाहता २४ तास आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे ही साळुंखे पाटील कुटुंबीयांची संस्कृती आणि परंपरा आहे. याच परंपरेनुसार कडलास आणि अचकदाणी या दोन्ही गावातील विकास कामात कोणतेही राजकारण न करता गावातील शेवटचा घटक केंद्रस्थानी म्हणून गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला मदत करण्याची भूमिका यापुढील काळात घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे अभिवचन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कडलास आणि अचकदानी गावातील ग्रामस्थांना दिले.


यावेळी कडलास गावातील ज्येष्ठ नेते सुनील पाटील, ॲड सतीश लेंडवे, राहुल गायकवाड, दत्ता टापरे, गिरीश गायकवाड, अशोक पाटील, विजयसिंह पाटील, पांडुरंग भजनावळे, शिवाजी जावीर, समाधान जावीर, सतीश ठोकळे, गणेश महांकाळ, गणेश वाघ, प्रशांत वाघ, दत्ता वाघ, प्रशांत साळुंखे, प्रशांत तेली, उमाजी वाघ, अक्षय जाधव, नितीन गायकवाड, सुनील गायकवाड, पांडुरंग काशीद, प्रवीण पाटील, शहाजी पाटील आदीसह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अचकदानी गावातील माजी सरपंच रेशमा मोरे, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विमल बुधावले, सुनंदा गंभीरे, रेश्मा जावीर, मिनाज मुलानी, ब्रह्मदेव खरात, आप्पासाहेब चव्हाण, विजय गंभीरे, अमोल मोरे, महेश गंभीरे, सुभाष चव्हाण, दिलीप मोरे, धनाजी काटे, अमित चव्हाण, अक्षय कोळेकर, सत्यवान चव्हाण, अण्णा मोरे, विष्णु बुधावले, सोमनाथ जावीर आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!