महायुती सरकारकडून दिलासा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर – चेतनसिंह केदार सावंत

महायुती सरकारकडून दिलासा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कष्टानं उभे केलेले पीकं वाहून गेलंय. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. शेतकऱ्यांचे फक्त शेतीच नाही तर, घर आणि जनावरं देखील वाहून गेली आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
राज्यात अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेती, पिके, घरे, जनावरे वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
राज्यातील नुकसाग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आज जाहीर केलेल्या मदतीमध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये, तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ३२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय पूरग्रस्त भागातील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमी व्यक्तींनाही मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफ करण्यात येत असल्याची देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी 3 लाख रूपये दिले जाणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकी, जखमी व्यक्तींना : 74 हजार रुपये ते 2.5 लाख, घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान: 5 हजार रुपये प्रतिकुटुंब, कपडे, वस्तूंचे नुकसान: ५ हजार रुपये प्रतिकुटुंब, दुकानदार, टपरीधारक: 50 हजार रुपये, डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : 1 लाख 20 हजार रुपये, डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : 1 लाख 30 हजार रुपये, अंशतः पडझड 6 हजार 500 रुपये, झोपड्या 8 हजार रुपये
जनावरांचे गोठे 3 हजार रुपये, दुधाळ जनावरे: 37 हजार 500 रुपये, ओढकाम करणारी जनावरे 32 हजार रुपये, कुक्कुटपालन 100 रुपये, एनडीआरएफचे निकष 2 हेक्टर, परंतु त्यापेक्षा अधिकची मदत, 3 हेक्टर, निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये, अतिरिक्त, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार प्रतिहेक्टर रोखीने आणि मनरेगाअंतर्गत 3 लाख रुपये प्रति हेक्टर, खचलेली किंवा बाधित विहीर 30 हजार रुपये, तातडीच्या मदतीसाठी 1 हजार 500 कोटी रुपये डीपीडीसीत राखीव, शेतकऱ्यांना मिळणार मदत: 48 हजार रुपये प्रतिहेक्टर, पीकविमा: अंदाजे 5 हजार कोटी. तसेच जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिल माफी आधीच, शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा दुष्काळी सुविधा लागू करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.