गुजरात अभ्यास दौऱ्यातून आधुनिक फळबाग शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात
पेरू, अंजीर व आंबा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात राबविणार – कृषी मार्गदर्शक अजय आदाटे व अक्षय सागर यांचा मानस

गुजरात अभ्यास दौऱ्यातून आधुनिक फळबाग शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात
पेरू, अंजीर व आंबा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात राबविणार – कृषी मार्गदर्शक अजय आदाटे व अक्षय सागर यांचा मानस
सांगोला (प्रतिनिधी): पेरू, अंजीर आणि आंबा या फळपिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गुजरात राज्यात आयोजित कृषी अभ्यास दौऱ्यात कृषी क्षेत्रातील मान्यवर व प्रगत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रगत शेतकऱ्यांच्या फळबागांना भेटी देऊन आधुनिक लागवड पद्धती, नवीन उच्च उत्पादन देणाऱ्या व्हरायटी, ठिबक सिंचन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, छाटणी तंत्रज्ञान, तसेच संरक्षित शेती पद्धती यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला.
या दौऱ्यामध्ये पेरू, अंजीर आणि आंबा पिकांमध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येते, झाडांची योग्य वाढ आणि दर्जेदार उत्पादनासाठी वैज्ञानिक व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन घेण्यात आले. विशेषतः गुजरातमधील प्रगत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत आर्थिक प्रगती कशी साधली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव सहभागी शेतकऱ्यांना मिळाला.
या अभ्यास दौऱ्यात तज्ज्ञ शेतकरी व कृषी मार्गदर्शकांकडून सखोल मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या अनुभवाच्या आधारे महाराष्ट्रात पेरू, अंजीर, आंबा आणि इतर फळपिकांच्या लागवडीची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना आर्थिक उत्कर्षाच्या दिशेने नेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन सुधारित व्हरायटी, तसेच शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण शेती प्रयोग महाराष्ट्रात आणण्याचे नियोजन **ॲग्रीकॉस** माध्यमातून करण्यात येत आहे. या माध्यमातून लवकरच पेरू, अंजीर आणि आंबा पिकांमध्ये एक वेगळा आणि प्रगत शेती प्रयोग राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी कृषिमित्र अजय आदाटे आणि अक्षय सागर या दोन्ही ॲग्रीकॉस पदवीधरांनी मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्या मनोगतात सांगितले की, गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या आधुनिक शेती पद्धतींचा अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन व्हरायटी उपलब्ध करून देऊन शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सातत्याने काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.
या अभ्यास दौऱ्यामुळे सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीची दिशा मिळाली असून पेरू, अंजीर आणि आंबा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ होऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागणार आहे. या साठी सर्व अडचणीतील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग येथे संपर्क करून मार्गदर्शन घेऊन आपले आर्थिक भरभराट करावी असे आवाहन सॅप फार्म मॅनेजमेंट टीम कडून करण्यात आले आहे.


