अतिवृष्टीग्रस्त ८४ हजार ३४६ शेतकऱ्यांसाठी ७३ कोटी ५४ लाखांच्या अनुदान वितरणास मान्यता
सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात, ५९ कोटींच्या अनुदानास मंजुरी

अतिवृष्टीग्रस्त ८४ हजार ३४६ शेतकऱ्यांसाठी ७३ कोटी ५४ लाखांच्या अनुदान वितरणास मान्यता
सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात, ५९ कोटींच्या अनुदानास मंजुरी
सांगोला (प्रतिनिधी ): राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सोलापूर जिल्ह्यासह नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सुमारे ८४ हजार ३४६ शेतकऱ्यांच्या ७३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. यात सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले होते. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७३ कोटी ५४ लाखांच्या अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकार अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अनुदान देते. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सोलापूर जिल्ह्यासह नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सुमारे ७३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७३ कोटी ५४ लाखांच्या अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या ५६ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना ५९ कोटी ७९ लाख १७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३९५ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना १८ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १३ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना ७ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील ३ हजार ६४८ शेतकऱ्यांच्या २ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना २ कोटी ३० लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील ७ हजार ४५१ शेतकऱ्यांच्या ४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना ३ कोटी ९२ लाख ९२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.