सूर्योदय अर्बनने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
एलकेपी मल्टीस्टेट आयोजित रील स्पर्धेचेही बक्षीस वितरण

सूर्योदय अर्बनने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
एलकेपी मल्टीस्टेट आयोजित रील स्पर्धेचेही बक्षीस वितरण
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये सात शाखांच्या माध्यमातून विविध व्यावसायिक आणि उद्योजकांबरोबरच महिला भगिनींच्या आर्थिक सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेली आणि सूर्योदय ग्रुपचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेली सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला

सांगोला शहरातील मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये असंख्य सभासदांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले , सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी तसेच सह्याद्री परिवाराच्या सौ सुवर्णा इंगवले, ऑडिटर उमा उंटवाले, महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चना इंगवले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुजाता पाटील इत्यादी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सुजाता सरवदे, मेघा भागवत , निशा दौंड यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला तर प्रदीप कदम, कविता डोंबे, गीता दौंड, आशा लोखंडे, सारिका घाडगे आणि मनीषा सावंत यांनी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सांगोला शहर आणि तालुक्यातील सुमारे 124 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून पहिल्या पाच क्रमांकासाठी अनुक्रमे फ्रिज, आटाचक्की, ओव्हन, मिक्सर आणि कुकर अशी बक्षीसे देण्यात आली. तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल आकर्षक भेटवस्तू देण्यात आली .
सोलापूर जिल्ह्यातील व्यवसायिकांच्या विशेषतः महिलांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे दृष्टिकोनातून कार्यरत असलेल्या या संस्थेच्या चेअरमन सौ अर्चनाताई अनिल इंगवले यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये चालू घडामोडीवर आधारित केलेल्या सजावटीला प्राधान्य देण्यात आले होते. यामध्ये स्पर्धकांनी पहलगाम हल्ला, मोबाईलचा अतिरेक, मराठा आरक्षण, जगाचा पोशिंदा शेतकरी, भारताचे संविधान, स्त्री सशक्तिकरण, भारतीय संस्कृती यासारखे अनेक विषय साकारत उत्कृष्ट कलाविष्कार सादर केला होता. परीक्षक म्हणून लाभलेल्या आदर्श शिक्षिका सौ सरला शिर्के आणि सौ स्मिता गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण आणि पारदर्शी परीक्षण करून या सर्व निवडी जाहीर केल्या. त्याचबरोबर एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने गौरी गणपती या विषयावर अभिनव अशी रील स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.
आकर्षक अशा पद्धतीची रील बनवून इन्स्टा, फेसबुक तसेच युट्युब अकाउंटला पोस्ट केलेल्या सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या स्पर्धकांनी बक्षिसे प्राप्त केली असून या स्पर्धेमध्ये अथर्व दिघे व ओम शितोळे, हर्षल कांबळे, मकरंद भोरे, प्रशांत लोखंडे आणि दत्ता जगताप यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांकाची बक्षिसे पटकावली असून त्यांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये सात हजार, पाच हजार,तीन हजार, दोन हजार व एक हजार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. आर्थिक संस्थांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा आणि आर्थिक व्यवहार उत्कृष्टपणे पार पाडत एकीकडे वित्तीय संस्था सक्षमपणे चालवत असताना दुसऱ्या बाजूला सातत्याने अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रम घेऊन सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट या संस्थांनी सामान्यांच्या मनात आपले घर करून जनमानसातील लोकप्रियतेचा आलेख सातत्याने चढता ठेवलेला आहे. या स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न करणेकरिता सूर्योदय समूहातील या संस्थांच्या कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.



