ग्राहकांच्या विश्वासामुळे माणगंगा परिवार बँकेची विश्वासार्हता वाढली – नितीन (आबासाहेब) इंगोले
वाकी (शिवणे) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

ग्राहकांच्या विश्वासामुळे माणगंगा परिवार बँकेची विश्वासार्हता वाढली – नितीन (आबासाहेब) इंगोले
वाकी (शिवणे) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
सांगोला (तालुका प्रतिनिधी):
छोट्या व्यावसायिक, उद्योजकांना पतपुरवठा करण्यासाठी माणगंगा परिवार अर्बन बँकांची सुरुवात करण्यात आली. बँकेने लोकांचा विश्वास संपादन केला असून ग्राहकांच्या विश्वासामुळे माणगंगा परिवार बँकेची विश्वासार्हता वाढली असल्याचे मत माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी व्यक्त केले. माणगंगा परिवार बँकेच्या वाकी (शिवणे) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे असून अशा भावनेतून काम करणारी संस्था मोठी होते, याचेच उत्तम उदाहरण माणगंगा परिवार अर्बन बँक आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीसोबत त्या-त्या काळातील आव्हानांना स्वीकारून, सोबत घेऊन पुढे जाणारी संस्था मोठी होते. माणगंगा परिवार बँकेने वेळेत कोअर बँकीग सोल्युशन्स अंगीकारून सर्व प्रकारच्या आधुनिकीकरणाची सुरुवात केली. उद्योग व्यवसायाला वित्तीय संस्थांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याशिवाय विकास होत नाही. सामान्य माणसाशी असणारे जिव्हाळ्याचे नाते हे माणगंगा परिवार अर्बन बँकेचे वैशिष्ट्य असल्यानेच ग्राहकांचा या बँकेवरचा जनतेचा विश्वास वाढला असल्याचे माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी सांगितले.
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या (वाकी शिवणे) शाखेने गेल्या एका वर्षात शाखेने ग्राहकांचा विश्वास संपादन करत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. समाधानी ग्राहक, उत्तम व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि सर्व सेवा संपन्न शाखा या वैशिष्ट्यांमुळे वाकी शिवणे शाखा आज परिसरात एक विश्वासार्ह आर्थिक केंद्र म्हणून उभी राहिली आहे. शाखा व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वर्गाने एकत्रितपणे उत्कृष्ट टीमवर्क करून शाखेचा ठेवी व कर्ज व्यवहारात उल्लेखनीय वाढ केली. ३ कोटी ठेवींच्या लक्ष्याच्या दिशेने शाखा यशस्वी वाटचाल करत आहे, हे समाधान व्यक्त करण्यात आले.
माणगंगा परिवार अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे यांनी या प्रसंगी बोलताना, ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचा समर्पित प्रयत्न हेच संस्थेच्या प्रगतीचे खरे बळ आहे. वाकी शिवणे शाखा ही ग्राहकांना समाधानकारक व विश्वासार्ह सेवा देणारी सर्व सेवा संपन्न शाखा म्हणून भविष्यात आणखी नवे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी तुकाराम जाधव, मच्छिंद्र जाधव, बाळासाहेब काटकर, विलास दणके, धनंजय घाडगे, साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय शंकर, बंडू घाडगे, सुरेश जाधव, हणमंत सिद, लक्ष्मण सिद, भारत जाधव, सचिन पवार, विलास घाडगे, मोहित घाडगे, डॉ.गजानन टकले, मधुकर सपाटे, अनिल हंबीरराव, नारायण काटकर, सिद्धाराम बाबर, रामभाऊ जाधव, दत्तात्रय व्होटे, नामदेव चव्हाण, अंकुश लेंडवे, मारुती ढोले, बाबर दत्तू अर्जुन ननवरे, रणजीत जाधव, चंद्रकांत क्षीरसागर, गोरख लेंडवे, विजय सिद, अजित घाडगे, संभाजी घाडगे, सुधाकर साबळे, यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, ग्राहक, ठेवीदार, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ, ठेवीदार, ग्राहकांनीही शाखेच्या सेवा, तत्पर कर्मचारीवर्ग व पारदर्शक व्यवहार पद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत शाखेस हार्दिक शुभेच्छा दिल्या.