सामाजिक

माणभूमी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

माणभूमी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : माणभूमी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सांगोला यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सभेमध्ये संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

सभेच्या प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. आयेशा इब्राहिम मणेरी यांनी उपस्थित सभासद, संचालक मंडळ व अधिकारी यांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा शाखाधिकारी सौ. शामल राऊत यांनी सभासदांसमोर सादर केला. संस्थेच्या बचत व ठेव योजना, कर्ज व्यवहार, कर्ज वसुली, सभासद सेवा तसेच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत सभेत चर्चा करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या नूतन अध्यक्षा सौ. मनीषा वैभव जांगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेने मागील वर्षात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. सभासदांमध्ये नियमित बचतीची सवय निर्माण करणे, गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच संस्थेच्या सेवा अधिक सक्षम व सभासदाभिमुख करणे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

सभेमध्ये आगामी काळात संस्थेचे कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व सभासदाभिमुख करण्याचा निर्धार करण्यात आला. नवीन सभासद नोंदणी, बचत व ठेवींमध्ये वाढ, नियमित कर्ज वसुली, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण कर्ज वितरण तसेच महिलांसाठी उपयुक्त व आकर्षक आर्थिक योजना राबविण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. आसमा सैफुनहसन तांबोळी यांनी सांगितले.

संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी नियमित बचत करावी, कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत तसेच संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सौ. तेजश्री विधिन कांबळे यांनी केले.

सभासद, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून संस्था आगामी काळात अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्हपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित सभासदांनी व्यक्त केला. सभेच्या शेवटी उपस्थित सर्व सभासदांचे आभार मानून वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!