कमलापूर येथील आकाश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!
बनावट ग्राहक पाठवून सांगोला पोलिसांची धडक कारवाई; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कमलापूर येथील आकाश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!
बनावट ग्राहक पाठवून सांगोला पोलिसांची धडक कारवाई; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला–मिरज मार्गावरील कमलापूर शिवारात असलेल्या आकाश हॉटेल अँड लॉजिंग येथे महिलांना आणून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच्या गोपनीय माहितीवरून सांगोला पोलिसांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री धडक कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून कारवाई केली. यावेळी एका महिलेसह चंद्रकांत भिमराव मोटे (वय ४०, रा. तनाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल मालक अविनाश विष्णू येडगे (रा. तनाळी, ता. पंढरपूर) याच्यासह ग्राहक म्हणून आढळून आलेल्या अन्य सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सांगोला–मिरज मार्गावरील लॉजिंग व्यवसायात सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगोला पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कमलापूर शिवारातील आकाश हॉटेल अँड लॉजिंग येथे महिलांना आणून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमध्ये पंढरपूर उपविभागाकडील निर्भया पथकाचीही मदत घेण्यात आली. पंच तसेच बनावट ग्राहकाची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये जाऊन महिलेसोबत शरीरसंबंध करण्यासाठी मुलीची मागणी करण्याच्या सूचना दिल्या. बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये पैसे देऊन महिला उपलब्ध करून दिल्यास ठरलेल्या सांकेतिक पद्धतीने पोलीस निरीक्षकांना मिस्ड कॉल करण्याची सूचना देण्यात आली. पोलिसांचे पथक शासकीय वाहनांमधून साध्या वेशात घटनास्थळी रवाना झाले. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास बनावट ग्राहक हॉटेलच्या दिशेने गेला. काही वेळाने त्याने ठरल्याप्रमाणे पोलीस निरीक्षकांच्या मोबाईलवर मिस्ड कॉल करून सापळा यशस्वी झाल्याचा सांकेतिक इशारा दिला. यानंतर पोलिसांनी पंचांसह हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडला असता एका महिलेसोबत बनावट ग्राहक आढळून आला. बनावट ग्राहकाने सापळ्यापूर्वी पोलिसांकडून मिळालेली रक्कम कोणाकडे दिली, याबाबत विचारणा केली असता त्याने चंद्रकांत भिमराव मोटे (वय ४०, रा. तनाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यास दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी चंद्रकांत मोटे याला ताब्यात घेतले. खोली क्र
पोलिसांनी खोली क्रमांक ५०५ मध्ये प्रवेश करून पाहणी केली असता एका महिलेबरोबर बनावट ग्राहक आढळून आला. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हॉटेलचा मालक अविनाश विष्णू येडगे (रा. तनाळी, ता. पंढरपूर) असल्याचे सांगण्यात आले. कारवाईदरम्यान हॉटेलमधील खोली क्रमांक ५०६ चीही पाहणी करण्यात आली. तेथे ग्राहक म्हणून सातजण आढळून आले. या कारवाई प्रकरणी मपोउपनि स्नेहल विलास चव्हाण यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, चंद्रकांत भिमराव मोटे व हॉटेल मालक अविनाश विष्णू येडगे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १४३ तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४, ५ व ६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि सुप्रिया यादव, पोउपनि गुरव, पोना गवळी, पोकाॅंपोलिस कॉन्स्टेबल आवटे, पोलीस कॉन्स्टेबल सावंत, पोलीस कॉन्स्टेबल कुचेकर, पोकाॅंडी टिंगरे, मपोकॉ काझी, मपोकॉ वाघमारे तसेच पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी कथित वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.



