एल के पी मल्टीस्टेटला राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त
अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते पुणे येथे शानदार समारंभात पुरस्कार वितरण संपन्न

एल के पी मल्टीस्टेटला राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त
अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते पुणे येथे शानदार समारंभात पुरस्कार वितरण संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये त्रेचाळीस शाखांच्या माध्यमातून उत्तमरीत्या सेवा देणाऱ्या एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या वित्तीय क्षेत्रातील आदर्शवत कामकाजाची दखल घेऊन ‘रिसेल इन’ या अग्रगण्य संस्थेच्या वतीने या संस्थेला ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार’ प्राप्त झाला असून भारतीय सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले उत्कृष्ट मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या शुभहस्ते पुणे येथे एका शानदार समारंभामध्ये सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘गोल्ड लोन’ या कर्ज प्रकारामध्ये एलकेपी मल्टीस्टेटने महाराष्ट्रामध्ये अत्यंत दैदीप्यमान आघाडी घेतली असून या सुरक्षित कर्ज प्रकारामुळे ही संस्था अत्यंत मजबूतपणे वित्तीय क्षेत्रामध्ये आपली वाटचाल करत आहे. रिसेल मार्केट अँड रिसर्च ही भारतातील विविध क्षेत्रातील गुणवत्तेचा कसून शोध घेणारी एक दर्जेदार संस्था असून महाराष्ट्रातील सर्वांगाने गुणवत्तापूर्ण असलेल्या आणि लोकोत्तर सेवा देणाऱ्या काही निवडक संस्था तसेच व्यक्ती यांना मान्यवर सेलिब्रिटींच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करते. सहकाराची जाण असणारे व बँकिंग क्षेत्राचा सखोल अभ्यास असणारे आणि जवळपास वीस-बावीस वर्षांपासून वित्तीय क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्यरत असणारे सहकाररत्न अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एलकेपी मल्टीस्टेट ही संस्था वाटचाल करत असून गतवर्षी सुमारे साडेचारशे कोटीहून अधिकचा व्यवसाय या संस्थेने केलेला आहे.
अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा तसेच विविध कर्ज प्रकारांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या या संस्थेचे जवळपास 85% कर्ज हे ‘गोल्ड लोन’ असून अत्यंत सुरक्षितपणे कामगिरी या संस्थेची आजवर राहिलेली आहे. ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षा, सभासदांचे हित आणि ग्राहकांची सेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विशेषतः ‘सोनेतारण कर्ज’ यामध्ये अत्यंत उल्लेखनीय यश या संस्थेने प्राप्त केले असून याचीच दखल घेऊन ‘रिसेल इन अवॉर्ड 2026’ हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार या संस्थेला प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सभासद, सर्व ठेवीदार आणि ग्राहक यांच्यामध्ये समाधानाचे, आनंदाचे आणि विश्वासाचे वातावरण पसरले असून या पुरस्कारामुळे या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. यामुळे आम्ही सर्वजण प्रेरित झालो आहोत. आमच्या सर्व सन्माननीय ठेवेदारांच्या आणि ग्राहकांच्या आशीर्वादावर उत्तरोत्तर आम्ही प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकत राहू. अशा भावना यावेळी संस्थेचे चेअरमन सहकाररत्न अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केल्या.
पुरस्काराचा सन्मान स्वीकारताना सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन आणि अनिलभाऊ इंगवले यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चनाताई इंगवले, एल के पी मल्टीस्टेटचे सीईओ राजकुमार बहिरे तसेच सूर्योदय अर्बनचे सीईओ अजित दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



