शैक्षणिकसामाजिक

पालक आता घरबसल्या मोबाईलवर पाहणार वर्गातील शिक्षण….घरगणनेच्या मानधनातून शिक्षकाने वर्गात बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

राज्यातील पहिलाच उपक्रम : चौगुले-माळीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

पालक आता घरबसल्या मोबाईलवर पाहणार वर्गातील शिक्षण….घरगणनेच्या मानधनातून शिक्षकाने वर्गात बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

राज्यातील पहिलाच उपक्रम : चौगुले-माळीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

सांगोला (प्रतिनिधी): पालकांच्या मनात जि. प. शाळेविषयी अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी, विद्यार्थी शाळेच्या वेळेत सुरक्षित असावे तसेच शाळेच्या वेळेत 10 ते 5 वाजेपर्यंत विद्यार्थी व शिक्षक काय करतात? याची माहिती पालकांना घरात बसून मोबाईलवर व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले माळीवस्ती (आगलावेवाडी) केंद्र- जवळा, तालुका- सांगोला या शाळेतील राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी घरगणनेचे मिळालेlya १० हजार २०० रुपये मानधनातून शाळेतील वर्गात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस पालकांच्या मोबाइलवर उपलब्ध करून दिला आहे. पालकांना घरबसल्या वर्गातील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची शैक्षणिक स्थिती समजणार आहे.

जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांच्या मनात अधिक विश्वास निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी आणि शाळेतील शिक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी, या उद्देशाने सांगोला तालुक्यातील चौगुले- माळीवस्ती (आगलावेवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राज्यात पहिल्यांदाच एक अनोखा उपक्रम राबविला आहे. चौगुले- माळीवस्ती (आगळवेवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या अभिनव उपक्रमाचे शिक्षणप्रेमींकडून कौतुक होत आहे.पालकांच्या मनात जिल्हा परिषद शाळेविषयी अधिक विश्वासार्हता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेत सुरक्षितता सुनिश्चित व्हावी तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थी व शिक्षक शाळेत काय करतात, याची माहिती पालकांना घरबसल्या मोबाइलवर पाहता यावी, या उद्देशाने चौगुले-माळीवस्ती (आगळवेवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्र जवळा येथील राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक खुशालदीन शेख यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे.

मे महिन्यात जनगणनेच्या कामासाठी शिक्षक म्हणून घरगणना केल्याचे १० हजार २०० रुपयांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा झाले. या संपूर्ण मानधनातून त्यांनी शाळेतील दोन वर्गखोल्यात बसविलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन शाळेचे शिक्षणप्रेमी पालक नवाज खलिफा यांच्या हस्ते केले. यावेळी पालक सतीश नरळे, मुख्याध्यापक संतोष सोनलकर, शिक्षक खुशालदीन शेख यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक शेख यांनी स्वखर्चातून वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचा ॲक्सेस प्रत्येक पालकांच्या मोबाइलवर दिला आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थी व शिक्षक काय करतात, हे पालक घरातून केव्हाही पाहू शकतात. पालकांना शाळेतील पारदर्शकता समजून यावी, यासाठी सुरू केलेला हा कदाचित राज्यातील पहिलाच उपक्रम असावा.- संतोष सोनलकर, मुख्याध्यापक, चौगुले-माळीवस्ती जिल्हा परिषद शाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!