राजकीय

अजितपर्व हरपले… महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ माणूस काळाच्या पडद्याआड

अजितपर्व हरपले… महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ माणूस काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती येथील विमानतळावर विमान अपघातग्रस्त होऊन यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

इतिहास अजितपर्वाचा…

अजित पवार यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार आहे, त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ‘देवळाली-प्रवरा’ या ठिकाणी झाला. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. अजित पवारांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव येतं. राजकारणात अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं. खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे.

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर पडून आपलं पॅनल निवडून आणण्याची किमया ज्या व्यक्तीने करून दाखवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. अजितदादांनी १९८३ ते ८४ यादरम्यान झालेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली होती. बारामती व इंदापूरच्या सीमेवर असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते १९८४ मध्ये निवडून गेले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचा आणि नंतर बँकेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार पाहताना बँकिंग क्षेत्रात त्यांनी कामातील आपल्या अनोख्या शैलीचा अमीट ठसा उमटवला. कालानुरूप तो दिवस उजाडला जेव्हा अजितदादा पवार यांनी १९९१ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि विधिमंडळ कामकाजातील अधिकृत सदस्य ते बनले. त्यानंतर दादांनी आपल्या विजयाची पताका फडकवत ठेवली. अनेकदा कॅबिनेट मंत्री पद त्यांनी भूषवले. पाणीपुरवठा, स्वच्छता व पाटबंधारे मंत्री पदाची धुरा सांभाळताना ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अशा सर्व विभागांमध्ये त्यांनी आदर्शवत कामं केली.

विशेष बाब अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघाची  निवडणूक लढवून आणि ती जिंकून अजितदादा अवघे २७ वर्षांचे असताना खासदार बनले. अशा पद्धतीने आमदार, खासदार आणि मंत्री अशी राजकीय कारकीर्द अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवली. विधानसभेचे गटनेते म्हणून समर्थपणे त्यांनी जबाबदारी सांभाळली. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. 1991 साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 ते 1995 या काळात ते विधानसभा सदस्य होते.

अजित पवार नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. 1999 ते 2004 या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. 1995 पासून 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. 2019 साली 1 लाख 65 हजारांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले. 2010 पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते.

2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्का होता. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.

पाच वेळा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

2010, 2012 मध्ये, 2019 मध्ये दोन वेळा आणि 2023 मध्ये अशा एकूण पाच वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले. जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि कामाची गती यासाठी ओळख निर्माण केली होती.

अजितदादा पवार : राजकीय कारकीर्द

राजकारणात प्रवेश- सहकार, शेती आणि ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग

बारामती परिसरात संघटनात्मक कामातून नेतृत्वाची ओळख, राज्य पातळीवरील प्रभावी नेता म्हणून उदय

संसदीय व विधानसभा कारकीर्द
लोकसभा सदस्य: जून १९९१ ते सप्टेंबर १९९१

महाराष्ट्र विधानसभा सदस्य (एकूण सात वेळा):
१९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

राज्यमंत्री म्हणून कारकीर्द

कृषी व ऊर्जा राज्यमंत्री: जून १९९१ – नोव्हेंबर १९९२
पाणीपुरवठा, ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर १९९२ – फेब्रुवारी १९९३
या काळात ग्रामीण विकास व पायाभूत सुविधांवर भर

कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची खाती
पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण), फलोत्पादन मंत्री: ऑक्टोबर १९९९ – जुलै २००४
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री: जुलै २००४ – नोव्हेंबर २००४
जलसंपदा व स्वच्छता मंत्री: नोव्हेंबर २००४ – नोव्हेंबर २००९
जलसंपदा व ऊर्जा मंत्री: नोव्हेंबर २००९ – नोव्हेंबर २०१०

राज्यातील धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प, पाणी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका

उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव

उपमुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) – नोव्हेंबर, २०१० ते सप्टेंबर २०१२.
उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) – डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४
२३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९
२ जुलै २०२३ – २६ जानेवारी २०२४
५ डिसेंबर. २०२४ पासुन अर्थमंत्री

विरोधी पक्षनेते:
४ जुलै २०२२ – ३० जून २०२३

संस्थात्मक व सामाजिक भूमिका
बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे – सदस्य
रयत शिक्षण संस्था, सातारा – संचालक
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – अध्यक्ष (सप्टेंबर २००६ पासून)
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – अध्यक्ष (ऑगस्ट २००६ – ऑगस्ट २०१८)
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – अध्यक्ष (सप्टेंबर २००५ – मार्च २०१३ व नोव्हेंबर २०१८ पासून)
महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ – संचालक
संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
संचालक : श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जि. पुणे
संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे
माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई

अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – (मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८)
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – (सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३)
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – (ऑगस्ट ,इ.स. २००६ पासून-)
अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – (मार्च २०१३ पासून-)

लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.

विधानसभा सदस्य :

इ.स.१९९१ इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते २०१४, इ.स.२०१४ ते २०१९, इ.स.२०१९ ते २०२४, २०२४-आजतागायत

राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा – इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.

राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.

मंत्री – पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.

मंत्री – ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.

मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.

मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!