राजकीय

सांगोल्यात झेडपीसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

झेडपीसाठी ६५ तर पंचायत समितीसाठी ९८ उमेदवारांची निवडणुकीतून माघार

सांगोल्यात झेडपीसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

झेडपीसाठी ६५ तर पंचायत समितीसाठी ९८ उमेदवारांची निवडणुकीतून माघार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सांगोल्यात उमेदवारी अर्ज पाऊस पडला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सात जागेसाठी तब्बल ६५ तर पंचायत समितीच्या १४ जागेसाठी ९८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत आहेत. सांगोल्यात झेडपीच्या ७ जागेसाठी ४१ तर पंचायत समितीच्या १४ जागेसाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बी.आर. माळी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिली.

सांगोल्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना यांच्या महायुती विरोधात शेकाप आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे गट यांची सांगोला तालुका विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रासप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, बसपा, वंचित बहुजन आघाडी यांनी देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले असून महायुती आणि आघाडीला आव्हान दिले आहे.

जवळा जिल्हा परिषद गटात माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. जवळा गटात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी माघार घेतली असून या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची महायुती झाली आहे.

चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत आणि विजयकुमार शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. महूद जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, आघाडीचे बाळासाहेब ढाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उत्तम खांडेकर यांच्या तिरंगी लढत होत आहे. कडलास जिल्हा परिषद गटामध्ये युवा नेते योगेशदादा खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे आणि नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीता शिंदे यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. कोळा जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचे माजी सभापती भाजपचे उमेदवार संभाजी आलदर यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार किरण पांढरे आपले नशीब आजमावत आहेत. काही जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणामध्ये अपक्षांनी देखील आव्हान निर्माण केले आहे.

महुद बु. जिल्हा परिषद गट ५ उमेदवार
दादासाहेब लवटे (शिवसेना), बाळासाहेब ढाळे (सांगोला तालुका विकास आघाडी), उत्तम खांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), गणेश गोडसे (वंचित बहुजन आघाडी), स्वप्नील ढेरे (अपक्ष)

महूद पंचायत समिती गण ३ उमेदवार
दिपाली नवल गाडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), सोनाली उमेश पाटील (शिवसेना), मनिषा हरिदास येडगे (सांगोला तालुका विकास आघाडी),

चिकमहुद पंचायत समिती गण ३ उमेदवार
बाळासो मच्छिंद्र बंडगर (शिवसेना), राकेश रविंद्र कदम (सांगोला तालुका विकास आघाडी), बबन किसन चव्हाण (शिवसेना उबाठा),

एखतपूर जिल्हा परिषद गट ४ उमेदवार
शिला संपतराव माने (शिवसेना), सिंधुताई मोहन आलदर (सांगोला तालुका विकास आघाडी), रतन अनिल शेंडगे (राष्ट्रीय समाज पक्ष), धनश्री बबन चव्हाण (अपक्ष),

वाकी शिवणे पंचायत समिती गण ३ उमेदवार
सुनिता धनाजी बाड (शिवसेना), स्मिता दीपक गोडसे (सांगोला तालुका विकास आघाडी), धनश्री बबन चव्हाण

एखतपूर पंचायत समिती ४ उमेदवार
ऋतुजा उद्धव जानकर (भाजप), सुवर्णा संजय नवले (सांगोला तालुका विकास आघाडी), रतन अनिल शेंडगे (रासप), निता शंकर खरात

जवळा जिल्हा परिषद गट ८ उमेदवार
सूर्यादित्य साळुंखे पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), अतुल प्रभाकर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मालोजी तानाजी पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनिल बाळासो शेंडगे (रासप), दत्तात्रय खटके, रणसिंह देशमुख, एकनाथ शेंबडे, हरिदास वाळके

वाढेगाव पंचायत समिती ३ उमेदवार
राणी गजानन उबाळे (शिवसेना), सिमा नवनाथ तोरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), वंदना भरत शेळके (सांगोला तालुका विकास आघाडी)

जवळा पंचायत समिती ४ उमेदवार
प्रज्ञा रघुनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा), भारती लालासाहेब देशमुख (भाजप), तृप्ती प्रशांत यादव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पूनम सुदर्शन इंगवले (सांगोला तालुका विकास आघाडी)

कडलास जिल्हा परिषद गट ५ अर्ज
शोभाताई बाबासाहेब खटकाळे (शिवसेना), संगीता नंदकुमार शिंदे (अपक्ष), संचिता टापरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), अनुसया मेटकरी, राणी टकले

कडलास पंचायत समिती ३ उमेदवार
अजित विश्वनाथ गायकवाड (शिवसेना उबाठा), राणी सुरज पाटील (शिवसेना), धनाजी गणपत पवार (अपक्ष)

अजनाळे पंचायत समिती ६ उमेदवार
मीनाक्षी परमेश्वर केंगार (शिवसेना), अक्षय बाळासो भजनावळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), शितल सचिन भडंगे (भारतीय जनता पार्टी), बापू अशोक जावीर (सांगोला तालुका विकास आघाडी), प्रज्योत उमेश काटे, परमेश्वर विठ्ठल केंगार

चोपडी जिल्हा परिषद गट ९ उमेदवार
चेतनसिंह केदार सावंत (भाजप), विजयकुमार शिंदे (अपक्ष), विकास मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तानाजी केदार (आम आदमी पार्टी), श्रीधर केंगार (बसपा), उल्हास धायगुडे, एकनाथ शेंबडे, रणसिंह देशमुख, काकासो बंडगर

राजुरी पंचायत समिती ४ उमेदवार
सदाशिव मारुती दबडे (भारतीय जनता पार्टी), काकासो सयाप्पा बंडगर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), समाधान शिवाजी रुपनर (सांगोला तालुका विकास आघाडी), प्रमोद भाऊसाहेब बाबर

चोपडी पंचायत समिती ३ उमेदवार
अजय उत्तम सरगर (शिवसेना), अनिल आप्पासाहेब जगदाळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), अतुल निवासराव फसाले (भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी)

कोळा जिल्हा परिषद गट ६ उमेदवार
संभाजी आलदर (भाजप), केराप्पा पांढरे (सांगोला तालुका विकास आघाडी), सचिन घाडगे (आम आदमी पार्टी), सदानंद पांढरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), सुदर्शन घेरडे (काँग्रेस), प्रफुल्ल कोकरे (अपक्ष)

कोळा पंचायत समिती ३ उमेदवार
सुलाबाई शिवाजी घेरडे (शिवसेना), विद्या उल्हास बिले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), छाया सोपान कोळेकर (सांगोला तालुका विकास आघाडी)

हातीद पंचायत समिती ३ उमेदवार
पोपट रामचंद्र गडदे (भारतीय जनता पार्टी), अमृत नारायण पाटील (सांगोला तालुका विकास आघाडी), समाधान नामदेव करडे

घेरडी जिल्हा परिषद गट ४ उमेदवार
संगीता सोमा मोटे (सांगोला तालुका विकास आघाडी), आरती श्रीकांत बुरुंगले (भाजप), वंदना रामचंद्र घुटुकडे (बसपा), शुभांगी अनिल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार).

सोनंद पंचायत समिती ७ उमेदवार
सुषमा राहुल काशीद (शिवसेना), स्वाती परेश खंडागळे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार), अलका शशिकांत ढगे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), उषा शहाजी बाबर (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), काजल मुकेश काशीद (सांगोला तालुका विकास आघाडी), ताई तानाजी काशीद, वर्षा सुरेश गवंड

घेरडी पंचायत समिती ५ उमेदवार
श्रीनिवास मधुकर करे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), वंदना रामचंद्र घुटूकडे (बहुजन समाज पार्टी), नवनाथ रामदास भोसले (भारतीय जनता पार्टी), परमेश्वर पांडुरंग गेजगे, अशोक नामदेव चोरमुले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!