“दूध कमी? भूक नाही? ही २० लक्षणं सांगतायत तुमचं जनावरं STRESS मध्ये आहे”

“दूध कमी? भूक नाही? ही २० लक्षणं सांगतायत तुमचं जनावरं STRESS मध्ये आहे”
भूक मंदावणे– चाराही समोर असताना न खाणे. पाण्याचे सेवन कमी होणे– तहान असूनही पाणी न पिणे. दुधउत्पादन घटणे– गाई/म्हशींमध्ये अचानक दूध कमी होणे.
– भूक मंदावणे– चाराही समोर असताना न खाणे.
– पाण्याचे सेवन कमी होणे– तहान असूनही पाणी न पिणे.
– दुधउत्पादन घटणे– गाई/म्हशींमध्ये अचानक दूध कमी होणे.
– वारंवार श्वास घेणे– शांत असतानाही श्वास लागल्यासारखा आवाज.
– हृदयगती वाढलेली– छातीचा धडधडाट जास्त जाणवतो.
– डोळे कोमेजलेले किंवा पाणावलेले– ताणाचे संकेत.
– कान मागे व शेपूट दाबून ठेवणे– अस्वस्थतेचं लक्षण.
– सतत बसून राहणे– उभं राहायला नाखूष असणे.
– अचानक वजन घटणे– खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे.
– कातडी कोरडी होणे व केस गळणे– पोषण कमी घेतल्याचे संकेत.
– लाळ जास्त येणे- तोंडातून गळती.
– रागीट किंवा घाबरट वागणे– इतर जनावरांना टाळणे.
– पोट फुगणे किंवा गॅसेस होणे- पचन बिघडल्याचे चिन्ह.
– डोळ्यांत लालसरपणा- ताणामुळे रक्ताभिसरण बदलतो.
– सतत गरगर फिरणे किंवा जमिनीवर पाय आपटणे – बेचैनी.
– घाम येणे (गाय, म्हैस)- विशेषतः उष्ण हवामानात.
– लंगडणे किंवा हालचाली मंदावणे– शारीरिक अशक्तपणा.
– रोजच्या कामगिरीत बदल– दूध देताना किंवा जोखताना विरोध करणे.
– सामाजिक वर्तन बदलणे– गटापासून दूर राहणे.
– अत्यंत शांत किंवा उलट आक्रमक होणे– मनोवैज्ञानिक ताणाचा परिणाम.
स्ट्रेस ओळखून वेळेत उपचार केल्यास जनावरांचे आरोग्य व उत्पादन दोन्हीही सुधारते.


