शैक्षणिक

सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे येथे डी.फार्मसी प्रथम प्रवेश फेरीसाठीचे ऑपशन फॉर्म चालू

सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे येथे डी.फार्मसी प्रथम प्रवेश फेरीसाठीचे ऑपशन फॉर्म चालू

सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या २००५ ची स्थापना असलेल्या महाविद्यालयात डी.फार्मसी, बी.फार्मसी व एम.फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दर वर्षी डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया शासन राबवते. हि प्रवेश प्रक्रिया विविध टप्यामधून राबवली जाते.
विद्यार्थी नोंदणी व निश्चिती, तात्पुरती यादी, अंतिम यादी, प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे,प्रथम फेरीसाठी उमेदवाराने स्वतःच्या लॉगीनमधून कॉलेजचे पसंतीक्रमांक नोंदणे, लागलेल्या पसंतीची स्वीकृती करणे, प्रवेश निश्चिती करणे इत्यादी. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीची डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया जुलैला चालू झाली होती. परंतु शासनाच्या काही तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी व इतर कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपर्यंत लांबली होती. त्यानंतर प्रवेशसाठीची पहिली फेरीची प्रक्रिया ०१ ऑक्टोबर पासून चालू होणार असून त्याचे ऑपशन फॉर्म ०१ ऑक्टोबर ते ०४ ऑक्टोबर या दरम्यान भरायचे आहेत. तसेच द्वितीय, तृतीय, चौथी फेरी व इन्स्टिट्यूट लेव्हल प्रवेश फेरी यांचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे. तरी डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी डॉ.ए.एम.तांबोळी (९९७५४०२४६५), डॉ.ए.डी.माळी (९९७५९२८३५०) व श्री.पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१ ) यांना संपर्क करावा.
प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया संक्षिप्त वेळापत्रक खालील प्रमाणे:
१ .प्रथम प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे: ०१/१०/२०२५ ते ०४/१०/२०२५.
२. प्रथम प्रवेश फेरी लिस्ट : ०७/१०/२०२५.
३ .प्रथम प्रवेश फेरीत नंबर लागलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांनी
कॉलेजच्या प्रवेशासाठी करावयाची प्रक्रिया : ०८ /१०/२०२५ ते १०/१०/२०२५.
४. द्वितीय प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे: १२/१०/२०२५ ते १३/१०/२०२५.
५ . तृतीय प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे: १९/१०/२०२५ ते २६/१०/२०२५.
६ . चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑपशन फॉर्म भरणे: ०१ /११/२०२५ ते ०३/११/२०२५.
७. इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म भरणे व प्रवेश प्रक्रिया : ०६ /११/२०२५ ते १५/११/२०२५.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!