किल्लारी भूकंप: भीती, संघर्ष आणि मानवतेची कहाणी

किल्लारी भूकंप: भीती, संघर्ष आणि मानवतेची कहाणी
किल्लारी भूकंपाला ३२ वर्षे पूर्ण; हजारो लोकांनी जीव गमावला..
महाराष्ट्राच्या इतिहासातील भळभळती जखम… लोक साखरझोपेत असताना भूकंप झाला अन् हजारो लोकांनी जीव गमावला… हजारो जनावरं दगावली. 1993 साली लातूरमध्ये काय घडलं? आज या दुर्घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. वाचा सविस्तर… रात्रीची शांतता, चंद्रप्रकाशात झोपलेली किल्लारीची गावे… अचानक जमीन थरथरायला लागली. घरांची भिंती तुटत होती, खिडक्या दिडपसरत फाटत होत्या, आणि हवेत धूर, धूळ आणि अंधार मिसळून भीतीची जाळी विणत होती. लोक घाबरटपणे बाहेर पळत होते, बाळांना आणि वयोवृद्धांना धरून सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न करत होते.
लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी प्रचंड विनाशकारी भूकंप झाला होता. रिश्टर श्रेणीनुसार त्याची तीव्रता ६.४२ होती. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी गावाच्या र्नैऋत्येला ४० किमी अंतरावर होता; आणि त्याची नाभी १० किमी खोल होती. लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांना या भूकंपाची झळ चांगलीच बसली होती.
लातूर जिल्ह्यातल्या ८१७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२७ खेड्यांवर या भूकंपाचा विपरीत परिणाम झाला. यांमधली ५२ खेडी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. जवळपास ११ हजार लोक मृत्युमुखी पडले होते आणि ३० हजारांहून अधिक जखमी झाले होते. इथे मातीमध्ये दगड रचून केलेली कच्ची घरे होती. त्यातून भूकंप ऐन पावसाळ्यात आणि तोही मध्यरात्री लोक झोपेत असताना झाला. त्यामुळे भूकंपात घरे कोसळून प्रचंड जीवितहानी झाली.
किल्लारी… महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक गाव. दिवस होता 30 सप्टेंबर 1993 चा. गणपती विसर्जनाचा हा दिवस… गणपती विरर्जन झाल्यानंतर हे गाव गाढ झोपी गेलं होतं. अख्खं गाव साखर झोपेत असताना पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवायला लागले. पुढे काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं. घरंच्या घरं जमीनदोस्त झाली. हजारो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. हजारो जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख आला की आजही अंगावर शहारा उभा राहतो.
अन् सारं सारं गमावलं…
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले. 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. 16 हजार लोक जखमी झाले. तर 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. घरं जमीनदोस्त झाली. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं अन् सारं सारं गमावलं.
लोकांचा टाहो…
एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि आप्तेष्टांना गमावल्यानंतर स्थानिकांनी टाहो फोडणं सहाजिक होतं. किल्लारीसह आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आप्तेष्टांना लोक शोधत होते. अचानकपणे कोसळलेला दु:खचा डोंगर लातूरवासीयांसह अवघा महाराष्ट्र दु:खात बुडाला.
श्री गणेशाला निरोप देऊन थकलेले भक्तगण साखर झोपेतच असताना ३० सप्टेंबर १९९३ च्या त्या काळरात्री धरणीकंप होऊन हजारो बळी गेले. ही घटना भल्या पहाटेच्या वेळी घडल्याने आणि त्याकाळी रेडिओ आणि दूरदर्शनशिवाय विश्वासार्ह माहिती मिळण्याचे माध्यम दुसरे कोणतेही माध्यम नव्हते. बीबीसी वृत्तसंस्थेने सर्वात आधी आणि पहिली बातमी देताना किल्लारी भूकंपात ५०० लोक मृत्यू पावल्याचे सांगितले होते. वेळ असेल, पहाटे साडेचार ते पाचदरम्यानची. पण प्रत्यक्षात लातूरकरांना दुर्घटना कळायला बराच वेळ झालेला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार प्रत्यक्ष किल्लारीत दाखल झालेले होते.
भूकंप झाल्याची माहिती आणि त्याचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याचे समजताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे झुंजमुंजू असतानाच तत्काळ किल्लारीत दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिसराचा आढावा घेतला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीपेक्षा प्रत्यक्षात खूप मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे, ही बाब लक्षात आल्याने पवार यांनी मंत्रालय मुंबईहून सोलापूरला आणले होते.
महाराष्ट्र दु:खात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आज या भूकंपाला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाची उल्लेख आला की, अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं.