भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक – किसन माळी
राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या खते औषधे व संजीवकांचा वापर

भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक – किसन माळी
राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या खते औषधे व संजीवकांचा वापर
सांगोला (प्रतिनिधी): गौडवाडी येथील शेतकरी किसन माळी यांनी पारंपारिक शेतीला बगल देऊन आपल्या दीड एकर क्षेत्रात डाळींब पिकाची लागवड केली. त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता ऑरगॅनिक स्वरूपातील खते व औषधांचा वापर करत त्यांनी सेंद्रिय तंत्रज्ञानावर आधारित डाळींब बाग फुलवली. त्यांनी डाळींब लागवड करण्यापासून फळधारणा होईपर्यंत सर्व कामे स्वतः नियोजनबद्ध व सेंद्रिय खते औषधे व संजीविके यांचा वापर करून राजलक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रतिनिधींकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन उत्कृष्ट प्रकारे बाग फुलवली असून प्रति फळाचे वजन ३०० ते ५०० ग्रॅम दरम्यान मिळण्याचा अंदाज यांनी व्यक्त केला.
उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खताचा अधिक वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर द्यावे लागते. साहजिच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी जमीनी खारवटतात. रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्या वापराचेदेखील अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. किटकांचा नाश करणारी किटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक किटक मरतात. त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडतात. खरे तर निसर्गाने स्वतःच अनेक गोष्टीचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली असते. निसर्गान ज्याप्रमाणे पिलांना उपद्रवकारक किटक असतात, त्याचप्रमाणे या किटकांवर उपजीवीका करणारेही काही किटक पक्षी प्राणी असतात.
रासायनिक खतांच्या वापरातून जमिनीच्या पोतावर होणारा दुष्परिणाम टाळणे या खतांच्या पिकांच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे किटकनाशके व तणनाशके यांचाही पिकांवर व पर्यायाने आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळणे या उद्देशातून सेंद्रीय शेती ही संकल्पना पूढे आली व विकसित झाली असे मत सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीचे प्रसार करणारे तज्ञ मार्गदर्शक वसंतदादा कृषी केंद्राचे संचालक बापूसाहेब गुळीक यांनी व्यक्त केले. डाळिंब पीक उत्पादन चांगले येण्यासाठी किसन माळी यांनी मेहनत घेतली. जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगनिक्सचे कृषी अधिकारी मिलिंद शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
डाळिंब पिकाच्या उत्पादनाविषयी व अर्थकारणाविषयी सांगताना म्हणतात की, उत्पादन करण्यापेक्षा नियोजन व शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर किसन माळी यांच्यासारखे उत्पादनात दुपटीने वाढ करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकतात. शेतकरी राजा हा देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे. तो मोडला नाही तर जगला पाहिजे या भावनेने काम करावे. – विजयकुमार इंगवले, जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रा. ली
डाळिंब पिकाचे उत्पादन करण्यासाठी मला वसंतदादा कृषी केंद्राचे संचालक बापूसाहेब गुळीक व मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. ४०० झाडांमध्ये २२ टनापर्यंत उत्पादन निघण्याची अपेक्षा मला आहे.