आपुलकी सदस्यांच्या उपस्थितीत मातोश्री वृद्धाश्रमाला सांगोला गुरुकुल कडून “शेळी” भेट

आपुलकी सदस्यांच्या उपस्थितीत मातोश्री वृद्धाश्रमाला सांगोला गुरुकुल कडून “शेळी” भेट
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र यादव व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सांगोला गुरुकुल सांगोला कडून दोन पिल्लासहित शेळी भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना राजेंद्र यादव म्हणाले की, समाजामध्ये अशा काही मोजक्याच समाजसेवी संस्था मनापासून कार्यरत आहेत त्यापैकीच मातोश्री वृद्धाश्रम हे सुद्धा आपले सामाजिक कार्य अतिशय मनापासून करीत आहे. ही संस्था वाढली पाहिजे टिकली पाहिजे. टिकवण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे.याच जाणिवेतून सांगोला गुरुकुल यांनी मातोश्री वृद्धाश्रमला दोन पिल्लांची शेळी भेट देण्यात आली. यामध्ये प्रमुख हेतू असा की वृद्धाश्रमाला आर्थिक संकटांचा जो सामना करावा लागतो. त्यातून त्यांना थोडेफार आर्थिक बळ मिळेल. आज एक शेळी भेट दिली. असेच समाजातील अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करतील. जेणेकरून त्यांना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी ते सक्षम होतील.
मातोश्री वृद्धाश्रमामध्ये निराधार आजी-आजोबांचा अतिशय उत्कृष्ट असा सांभाळ संस्थेचे अध्यक्ष राहुल जाधव व त्यांच्या मातोश्री सुवर्णा जाधव करीत आहेत. मातोश्री वृद्धाश्रम हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आम्ही शेळी भेट देण्याचे ठरवले होते जेणेकरून आज एक शेळी वृद्धाश्रमाला दिली. अशाप्रकारे समाजातील अनेक व्यक्ती समोर येऊन जर त्यांना या प्रकारची मदत झाली तर येणाऱ्या भविष्यामध्ये ते नक्कीच आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व जास्तीत जास्त निराधार आजी-आजोबांचे पालन पोषण करतील असा विश्वास सांगोला गुरुकुलचे अध्यक्ष गाडेकर सर यांनी केला. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य महादेव बोराळकर, सुरेशकाका चौगुले, वसंत माने, अमर कुलकर्णी, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मातोश्री वृद्धाश्रमाच्या सर्वेसर्वा मातोश्री सुवर्णा जाधव यांनी मानले.