खरीप हंगामात सोलापूर जिल्हा उद्दिष्टाच्या पेरणीत राज्यात प्रथम क्रमांकावर..
राज्याची खरीप पेरणीची दीडकोटी हेक्टरकडे वाटचाल

खरीप हंगामात सोलापूर जिल्हा उद्दिष्टाच्या पेरणीत राज्यात प्रथम क्रमांकावर.
राज्याची खरीप पेरणीची दीडकोटी हेक्टरकडे वाटचाल
सांगोला (दिलीप घुले): सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीने उच्चांक गाठला असून ४ लाख ४९ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात सगळ्यात जास्त खरीप पेरणी करत सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली असून उद्दिष्टाच्या खरीप पेरणीत प्रथम क्रमांकावर आहे.
सोलापूर जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत ४ लाख ४९ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १३३ टक्केच पेरणी झाली आहे. एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये बाजरी २२ हजार ७८४ हेक्टर (६२ टक्के), तूर ८३ हजार ९३३ हेक्टर (९६ टक्के), सोयाबीन १ लाख ३१ हजार ९७८ हेक्टर (१६२ टक्के), उडीद १ लाख ०६ हजार ६९१ हेक्टर (१८३ टक्के), मका ८९ हजार ८७६ हेक्टर (१८८ टक्के), मूग ७ हजार २३९ हेक्टर (४९ टक्के), भुईमूग ३ हजार ४८५ हेक्टर (६६ टक्के), सूर्यफूल ३ हजार ३४९ हेक्टर, तीळ ८ हेक्टर, कापूस ८३७ हे. अशा ४ लाख ४९ हजार ३०९ हेक्टर (१३३ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर ३२ हजार ६११ हेक्टर हेक्टरवर नवीन ऊस लागवड करण्यात आली आहे.
राज्यात यंदा लवकर खरीप पेरणी सुरू झाल्याने पेरणीचा आकडाही लवकर वाढला आहे. शिवाय बैलांऐवजी ट्रॅक्टरचा नांगरणी, कुळवणी व पेरणीसाठी वापर होत असल्याने दररोज राज्यात लाखांच्या पटीत पेरणी क्षेत्र वाढत आहे. २ सप्टेंबरपर्यंत राज्यात १ कोटी ४२ लाख ८१ हजार ०८३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक ४९ लाख ६२ हजार १९६५ हेक्टर, तूर १२ लाख १८ हजार ५८४ हेक्टर, मका १४ लाख ५० हजार ८६२ हेक्टर, भात १५ लाख ०२ हजार ५०५ हेक्टर, खरीप ज्वारी ८३ हजार ९९७ हेक्टर, बाजरी ३ लाख २४ हजार ५७२ हेक्टर, रागी ५८ हजार ३४० हेक्टर, उडीद ३ लाख ७५ हजार ६७८ हेक्टर, भुईमूग १ लाख ३५ हजार ३२१ हेक्टर, तिळ ३ हजार ६३५ हेक्टर, कारळ ३ हजार १३६ हेक्टर, सूर्यफूल ४ हजार ७१२ हेक्टर, नवीन ऊस लागवड २ लाख ५० हजार २६७ हेक्टर, कापूस ३८ लाख ४० हजार ५९९ हेक्टर, इतर तृणधान्य ३१ हजार २९० हेक्टर, इतर कडधान्य ३८ हजार ३०४ हेक्टर, इतर गळीतधान्य १ हजार ६३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.