मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस – जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला देवेंद्र फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद

मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस – जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला देवेंद्र फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्रात मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पुढे येत आहे. मराठा आरक्षणाचा लढा आजच्चा नाही. १९८० च्या दशकापासून आरक्षणाची मागणी होत आहे. या काळात शरद पवार तब्बल चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री होते. पण त्यांनी आपल्या सत्ता काळात आरक्षण का दिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला दोनवेळा आरक्षण मिळवून दिल्याने मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस हेच आहेत असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.
२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे केवळ सहानुभूतीपूर्वक न पाहता सकारात्मक प्रतिसाद दिला. २०१८ मध्ये त्यांनी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गातून विधीमंडळाच्या माध्यमातून एकमताने १६ टक्के आरक्षण मिळवून दिले होते. त्यानंतर मात्र राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणाच्या लढ्याला आवश्यक ती गती न मिळाल्याने, ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने, हे आरक्षण ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडत असल्याचे सांगून, ते रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचे पाप केले. आरक्षण कोर्टात न टिकण्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात आहे.
जून २०२२ मध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झाले. राज्यात महायुतीचे सरकार आले. या सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे हाती घेतला. २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात महायुती सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक २०२४ सादर करून, ते एकमताने मंजूर केले. या विधेयकाद्वारे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मूळ प्रश्नावर भर देत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन नवीन योजना सुरू करून ८०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत करताना राज्य सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्यावेळी शरद पवार हे मराठा समाजाचे असतानाही तसेच ते चार वेळा मुख्यमंत्री होते, अनेक वर्षे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचे काम केले.
मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी टिकणारे आरक्षण दिले, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते मिळाले नाही. मराठा आरक्षणाचे मारक केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप युती सरकारने २०१८ साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली.
देवेंद्र फडणवीस सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजातील घटकांसाठी काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकणार नाही, असे काही लोक म्हणत होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, फडणवीस यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर काही लोक मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने हे आरक्षण रद्द केल्याने या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकला नव्हता. मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, ते घटनेत आणि कायद्यात टिकायला हवे. महायुतीचे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे.
आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस आहेत असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.