महाराष्ट्र

कृषी क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आ. डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट

कृषी क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आ. डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट

सांगोला (प्रतिनिधी): विधानसभा मतदारसंघातील शेतकरी वर्गाच्या कृषी क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नासाठी तसेच कृषी औषधे व बी बियाणे केंद्र धारकांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत शेतकरी व कृषी औषधे व बी बियाणे विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी त्यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली.

यावेळी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील पी.एम किसान योजनेपासून वंचित असलेल्या १३८७ शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याची मागणी केली. महाडिबीटीद्वारे पेमेंटमध्ये असंख्य अडचणींमुळे शेतकरी विविध अनुदानांपासून वंचित राहत असून लवकरात लवकर त्यावर तोडगा काढावा अशी मागणी केली. त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रॅक्टर अनुदाना पासून वंचित असलेल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी मागणी केली. कृषी औषधे व बी बियाणे धारकांच्या मागण्यासंदर्भात यावेळी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी

रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून होणारे लिंकींग त्वरित बंद करावे तसेच शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित एच.टी.बी.टी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी, ‘साथी पोर्टल’चा वापर विक्रेत्यांवर सक्तीने न लादता, तो उत्पादक व पुरवठादार कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवणे, खतांचा पुरवठा FOR पद्धतीने करण्यात यावा त्याचबरोबर बियाणे सॅम्पल फेल झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरता साक्षीदार म्हणून मान्यता द्यावी, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची प्रलंबित रक्कम शासनाकडून तातडीने देण्यात यावी, खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व DAP खत वितरण पद्धतीचा फेरविचार करावा, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अवैध व निकृष्ट दर्जाच्या कृषी इनपुट्सवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

यावेळी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत, संबंधित विभागांना तपासणी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी व कृषी व्यवसायिकांना दिलासा मिळेल अशा उपाययोजना लवकरच करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!