आता चुकीला माफी नाही! IAS तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती
गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी थेट 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश

आता चुकीला माफी नाही! IAS तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती
गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश
गुटखा माफिया आणि भेसळमाफिया धास्तावले, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका सुरुच
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला (प्रतिनिधी): भ्रष्टाचाराला आणि नियमबाह्य कामांना आपल्या कडक शिस्तीने वठणीवर आणणारे धडाकेबाज IAS ऑफिसर तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. आणि पदभार स्वीकारताच अवघ्या काही दिवसांत त्यांनी असा काही कारवाईचा धडाका लावलाय की, राज्यातील भेसळखोर, काळाबाजार करणारे आणि ग्राहकांना फसवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
प्रतिबंधित गुटखा, पानमसालाबरोबरच खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारताच धडाकेबाज आणि शिस्तप्रिय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचे सत्र सुरू केले असून, भेसळखोर, गुटखा माफिया आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवघ्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत छापेमारी, धाडी आणि तपासणी मोहिमा राबवून FDA ने आपले आक्रमक रूप दाखवले आहे. ‘जनतेच्या आरोग्याशी कोणालाही खेळू देणार नाही’ असा स्पष्ट इशारा देत आयुक्त मुंढे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर राज्यभरातील शेकडो आस्थापनांवर धाडसत्र सुरू झाले असून, अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटखा, भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि नियमबाह्य व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा माफियांना सर्वात मोठा धक्का; ‘मकोका’ अंतर्गत कारवाईचे आदेश
राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध साम्राज्यावर निर्णायक घाव घालत FDA ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुटखा माफियांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यापूर्वीच्या कारवायांमध्ये किरकोळ विक्रेते किंवा पानटपरी चालक कारवाईच्या जाळ्यात अडकत होते. मात्र आता उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार, घाऊक विक्रेते, गोदाम चालक आणि संपूर्ण अवैध साखळीच FDA च्या रडारवर आली आहे.
बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर आता सांगोला परिसरातही FDA चे विशेष पथक दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरातील हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स, डेअरी व्यवसायिक आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधातही FDA ने आक्रमक भूमिका घेतली आहे. हॉटेल्स, ढाबे, डेअरी उद्योग, मिठाई उत्पादक आणि विविध खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची उत्पादने आणि नियमबाह्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत FDA ने अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गुटखा आणि भेसळविरोधी मोहिमेनंतर आता FDA ने आपला मोर्चा बोगस औषध कंपन्यांकडे वळवला आहे. राज्यातील औषध उत्पादक कंपन्या, त्यांची उत्पादन प्रक्रिया आणि औषधांमधील घटकांची तपासणी करण्यासाठी सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
‘गुटखा मुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कुठेही गुटखा विक्री, भेसळ दूध, भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा संशयास्पद औषध व्यवसाय आढळल्यास थेट FDA ला माहिती द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांकडून मिळालेल्या प्रत्येक माहितीची पडताळणी करून तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
दबावाला न झुकणारा अधिकारी पुन्हा चर्चेत
IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच कारवाई सुरु झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच ठाऊक आहे. नियमांवर चालणारा आणि कठोर शिस्तप्रिय अधिकारी ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. कठोर शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि कोणत्याही दबावाला न झुकणारा अधिकारी अशी ओळख असलेले IAS तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे चर्चेत आले आहेत. राज्यात ठिकठिकाणी धाडसत्र, छापेमारी सुरु आहे. अनेक वेळा बदल्यांना सामोरे जावे लागले तरी नियमांशी तडजोड न करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या नव्या कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि बोगस व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



