युवा नेते गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ म्हणून साजरा होणार
रक्तदान शिबिर, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

युवा नेते गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ म्हणून साजरा होणार
रक्तदान शिबिर, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते होणार शुभारंभ

सांगोला (प्रतिनिधी): वाढदिवस म्हटला की केक, फटाके आणि अनावश्यक खर्च अशी रूढ परंपरा असते. मात्र समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत युवा सेनेचे तालुकाप्रमुख, युवा नेते दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. सोमवार (दि. १५ जून) रोजी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्रपरिवार, सांगोला तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ संपन्न होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांचे जीव धोक्यात येतात. अशा गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळावा तसेच युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत गुंडादादा खटकाळे यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवला आहे. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचे संवर्धन या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने नागरिकांमधून त्याचे स्वागत होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्याची परंपरा जोपासणारे गुंडादादा खटकाळे हे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.
त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांविषयी कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार, दि. १५ जून रोजी गुंडादादा खटकाळे हे मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
रक्तदानातून जीवनदान, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा उपक्रम ठरणार आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मित्रपरिवाराने केले आहे.



