उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न
उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न
सुमारे 511 रक्तदात्यांच्या सहकार्याने रक्तदान सप्ताहाची सांगता
सांगोला (प्रतिनिधी): सहकार, उद्योग, अर्थक्रांती, धवलक्रांती याबरोबरच अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सामाजिक कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत बलशाली भारताच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक, एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन आणि सूर्योदय परिवाराचे कुटुंबप्रमुख उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला अभिष्टचिंतन सोहळा हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत सूर्योदय बँक्वेट हॉल सांगोला येथे उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. अनिलभाऊंच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी आणखी व्यापक स्वरूपात ‘रक्तदान सप्ताह’ अशी अभिनव संकल्पना राबविण्यात आली.
सूर्योदय ग्रुप मधील इतर सर्व संस्थांबरोबरच दोन राज्यात अग्रगण्य असलेल्या एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि शेजारील कर्नाटक राज्यामध्ये एकूण 43 शाखांच्या माध्यमातून विस्तार झालेला आहे. या सर्व शाखांच्या तसेच सूर्योदय ग्रुपच्या माध्यमातून सहकारतपस्वी आणि कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या अनिलभाऊंच्या सन्मानार्थ रक्तदान सप्ताहाचे आयोजन करून विविध स्तरांवरती रक्तदान शिबिरे घेण्यात आली. या कामी ‘रेवनील ब्लड बँक’ ग्रुपने उत्कृष्ट नियोजन केले होते.
वृक्षारोपणासारखे पर्यावरण पूरक उपक्रम, नेत्ररोग निदान शिबिर, स्त्रीरोग निदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी तीर्थयात्रा दर्शन, जलसंधारण आणि दुष्काळ निवारण कार्य, अन्नदान सेवा यासारख्या अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रमा बरोबरच ‘रक्तदान शिबिराची’ सूर्योदय उद्योग समूहाची अनेक वर्षांची परंपरा असून दरवर्षी विविध भागातील रक्तदात्यांचा सहभाग वाढत चाललेला आहे. रक्त हे कोणत्याही शेतात पिकत नाही. किंवा फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. केवळ मानवी शरीरामधूनच ते उपलब्ध होऊ शकते. एकाच वेळी दान केलेल्या रक्ताचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तांबड्या पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स अशा तीन वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन करण्यात येते. त्यामुळे एक रक्तदाता तीन वेगवेगळे जीव वाचवू शकतो. नियमित रक्तदानाने रक्ताभिसरण सुधारते तसेच शरीरातील अतिरिक्त लोह नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.
रक्तदान हे इतरांचे जीवन वाचवण्यासाठी केलेली अत्यंत सुरक्षित आणि निस्वार्थी प्रक्रिया आहे. त्यामुळे मानव जातीसाठी निस्वार्थ भावनेने केलेले सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिरांकडे पाहिले जाते. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशी अनिलभाऊ इंगवले यांनी समाजातील गरजू व्यक्तींसाठी उत्कृष्टपणे सामाजिक कार्य करणाऱ्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला यावेळी रोख 11 हजार रुपयांची देणगी देखील दिली. सकाळी दहा वाजले पासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण दिवसभर चाललेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी विविध भागातील शुभचिंतकांनी खूप मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सांगोला तालुका, जिल्हा तसेच राज्यभरामधून अनेक मान्यवरांनी दूरध्वनी वरून तसेच उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, माजी आमदार एड शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत आपला शुभसंदेश पाठवून दिला. कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे सभापती चेतनसिंह केदार, जि प सदस्य अतुल पवार, सांगोला पंचायत समितीचे मि. सभापती सुदर्शन इंगवले, जि प सदस्य किरण पांढरे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पना शिंगाडे, वैशाली घुगे, मंगळवेढ्याचे माजी सभापती संभाजी गावकरे, लयभारी उद्योग समूहाचे प्रमोद साळुंखे, अरविंदभाऊ केदार, दत्ता जाधव, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, सुवर्णरत्नचे महादेव बिराजदार, उद्योजक महादेव दिघे ,संजय साळुंखे, विठ्ठल मल्टीस्टेटचे दीपक बंदरे, डॉ विजयकुमार इंगवले, डॉ.शिवराज भोसले, डॉ. संतोष पिसे, डॉ.सचिन गवळी, माजी नगरसेवक सतीश सावंत, मानदूतचे संपादक मोहन मस्के, नगरसेवक विवेक पाटील, अरुण पाटील, प्रशांत धनवजीर, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, मेडशिंगीचे सरपंच प्रताप इंगवले, माजी सरपंच संजय रुपनर, जालिंदर माने, अण्णासाहेब राऊत, ऍड सतीश लेंडवे, ऍड धनंजय लिगाडे, सागर कापले , उद्योजक परमेश्वर गेळे, जगदीश पाटील, प्रशांत पाटील, चेअरमन वैभव लेंडवे, विश्वास पाटील, अशपाक पठाण, सुभाष अनुसे, संतोष घाडगे, महेश नष्टे, रणजीत होनमाने, ज्ञानेश्वर इमडे, कैलास गोरे, अंबिका डिजिटलचे क्षीरसागर इत्यादी मान्यवरांसह दिवसभरात हजारो मित्रपरिवारांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठान, श्रीराम प्रतिष्ठान, जनसंजीवनी परिवार, कृषिरत्न पतसंस्था, गोकुळ पतसंस्था, शिवरत्न पतसंस्था, रत्नपारखी ज्वेलर्स परिवार, माजी सैनिकांच्या संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक संघटना तसेच सांगोला येथील जय गजानन भक्त मंडळ, विविध संस्था, विविध महापुरुषांची जयंती उत्सव मंडळे, गणेशोत्सव मंडळे, शिवरत्न क्रिकेट संघ यासारख्या विविध संस्था आणि संघटनांकडून देखील उपस्थित राहून अभिष्टचिंतन करण्यात आले. वाढेगाव येथील विठ्ठल भक्त दीपक बंदरे यांच्या विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने संतांच्या वेशात करण्यात आलेल्या अनिलभाऊंच्या सत्काराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सर्व उपस्थितांसाठी सूर्योदय बँक्वेट हॉल येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
वित्तीय संस्था त्याचबरोबर व्यवसाय आणि उद्योग समर्थपणे सांभाळत असताना सामाजिक भान ठेवून कायम सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय परिवाराबद्दल आणि संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या बद्दल अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र कौतुक केले जात आहे. अभिष्टचिंतन सोहळा संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक सर्वश्री जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी तसेच एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय समूहातील कर्मचारी वृंदांनी अथक परिसर घेतले.



