स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर – ॲड. शहाजीबापू पाटील
महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व राणीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने सोयीस्कर – ॲड. शहाजीबापू पाटील
महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व राणीताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
सांगोला (प्रतिनिधी): केंद्रात भाजपचे सरकार आहे तर राज्यात भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे सरकार सत्तेत आहे. स्थानिक पातळीवर विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून कडलास जिल्हा परिषद गटातून शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास पंचायत समिती गणातून राणीताई पाटील हे सक्षम उमेदवार दिले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळावे यादृष्टीने सर्वांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन करीत माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ सिद्धनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला.
सिद्धनाथाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून या निवडणुकीत आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अकोला येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यप्रसंगी केले. पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, 2014 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आम्ही सामील झाल्यानंतर तालुक्यातील विकासाला मोठ्या प्रमाणात गती आली व तालुक्याचा चौफेर व सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला. कोणत्याही निवडणुकीत सत्तेबरोबर राहिल्यास निश्चितपणे विकास साधता येतो. कडलास गटात व गणात दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत. तालुक्यातील भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन शहाजीबापू पाटील यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केले.
यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, सध्या मी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत असून कडलास जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार मातोश्री शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बापूंचा शब्द अंतिम मानून शिवसेनेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करेन असा ठाम विश्वास व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे, सरपंच धनश्री गव्हाणे, चेअरमन अनिल खटकाळे, उपसरपंच महादेव शिंदे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, सौदागर केदार, विष्णुपंत केदार, आनंद घोंगडे, प्रशांत तेली, राहुल गायकवाड, पांडुरंग लिगाडे, तंटामुक्ती अध्यक्ष किसन शिंदे, सुरज पाटील, शशिकांत बुरले, मोहन लांब, पांडुरंग आसबे, विक्रम शिंदे, राम शिंदे, माजी चेअरमन महादेव शिंदे, व्हा
चेअरमन अनिल शिंदे, माजी उपसरपंच गणेश शिंदे, चेतन खटकाळे, आनंदराव खटकाळे, समाधान खटकाळे, जगन्नाथ खटकाळे, संजय चंदनशिवे, कृष्णाबाई खटकाळे, सुवर्णा खटकाळे, शारदा खटकाळे, सुनंदा खटकाळे, अश्विनी आसबे, हिराबाई शिंदे, अनिता शिंदे, प्रणाली शिंदे, बेबीताई आसबे, राजलक्ष्मी पाटील, राजाक्का केदार, सविता खटकाळे, सुरेखा केदार, वनिता केदार, आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.



