एकात्मिक पद्धतीची व आधुनिक तंत्रज्ञांनाची शेतीला हवी जोड : कृषीमित्र अजय आदाटे (ॲग्रीकॉस)

एकात्मिक पद्धतीची व आधुनिक तंत्रज्ञांनाची शेतीला हवी जोड : कृषीमित्र अजय आदाटे (ॲग्रीकॉस)
राष्ट्रीय शेतकरी दिन २०२५: भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित समर्थक चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
वातावरणाच्या बदलानुसार शेतीवरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी पिकांवर एवढे कीड व रोग येत नसायचे परंतु आत्ताच्या असंतुलित वातावरणामुळे कीड व रोगांचे प्रमाणही वाढले आहे. शेतकऱ्याने एकाच शेती पद्धतीच्या मागे न धावत एकात्मिक शेतीचे नियोजन करून उत्पादनात कशी वाढ करता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. आजचा शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही, पण तो शेती विकतो का हो?
मुळीच नाही! जर मग शेतीच करायचीच आहे तर शेतीची एकात्मिक पद्धत वापरून शेती करून पहा….
मग बघा शेती शिवाय करमतेय का ते.
आज एवढ्या सुविधा उपलब्ध आहेत जसे की मोबाईल, इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक, टेलिग्राम यांचा वापर आपण शेती साठी करू शकतो. एका क्लिक वर शेतीबद्दल शास्त्रीय माहिती मिळतेय. आज एकही तरुण शोधूनही सापडणार नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही. तंत्रज्ञनाचा वापर शेतीत करून भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. तंत्रज्ञनामुळे आपल्याला रोजच्या हवामानाची माहिती मिळते आणि पुढच्या काही दिवस हवामान कसे असेल याचा देखील अंदाज वर्तवला जातो. त्यानुसार पिकांवर कोणत्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो हे देखील वर्तवले जाते. त्यानुसार आपण एकात्मिक पध्दतीने नियोजन करून कीड व रोगांवर मात करू शकतो. असे मत रोमिफ इंडियाचे प्रेसिडेंट अजय आदाटे यांनी व्यक्त केले.
भारतामध्ये कृषी निर्यातीचा टक्का हा वाढत आहे आणि त्यात डाळिंब आणि केळीचे खूप मोठे योगदान आहे परंतु तांत्रिक गोष्टी अभावी ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने ही पिके मागे पडते आहेत. त्यामुळे ॲग्रीकॉस च्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांचे तांत्रिक चर्चासत्र आयोजित करून निर्यातीसाठीचे निकष पाळून हे उत्पादन कसे पिकवावे याचं पूर्णपणे मार्गदर्शन हे चर्चासत्राद्वारे करण्यात येते.
आपल्या शेतात काय पिकते ते बाजारात विकण्यापेक्षा बाजारात काय विकते ते पिकवने काळाची गरज आहे. बाजाराचा अभ्यास करून पिकांची लागवड करावी. यामुळे भावही उत्तम मिळेल. शेतकऱ्याला स्वतःला कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक याची पुरेपूर माहिती व्हायला हवी. शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे तेव्हाच शेतकरी सुधारेल व भारत खऱ्या अर्थाने कृषिप्रधान होईल. भारतामध्ये 70% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. शेतकरी जर आर्थिक दृष्ट्या सुधारला तर आपला भारत देशही आपोआप सुधारेल.
शेती ही आता एक व्यवसाय म्हणून करावी असे करण्यासाठी ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स च्या माध्यमातून व्हाट्सअप , टेलेग्राम, फेसबुक सहितच आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे करण्यात येत आहेत, त्यांची माहिती आपल्या पर्यंत पोहचवली जाईलच, आज असेच चर्चासत्र कृषी दिनाचे निमित्ताने संध्याकाळी सहा वाजता आर्यन ॲग्रो एजन्सी, सुपली येथे आयोजित करण्यात आलेले आहे. कृषिदिनाच्या पुन्हा एकदा हार्दीक शुभेच्या, नक्कीच आपण या चर्चासत्राचा विनामूल्य लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पादन काढाल हीच कृषीदिनाचे निमित्ताने एक विचार व्यक्त करतो.

9763640726, 9607535535 या क्रमांकावर चर्चासत्रासाठी संपर्क करावा.
ॲग्रीकॉस ब्रीद वाक्य
आपली शेती हेच आपले भविष्य


