राजकीय

कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी कुणाच्या दारात जाण्याची गरज नाही : पालकमंत्री गोरे

कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी कुणाच्या दारात जाण्याची गरज नाही : पालकमंत्री गोरे शेकापमधील नेत्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी कुणाच्या दारात जाण्याची गरज नाही : पालकमंत्री गोरे

शेकापमधील नेत्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

सांगोला ( प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वत्र विकासाची कामे सुरू आहेत. याच मुद्द्यावरून उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्यासह शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील नेतेमंडळी व असंख्य कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या सर्वांना ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही सुचविलेली विकासाची कोणतीही कामे करण्यासाठी कुणाच्या दरात जाण्याची गरज नाही. मुख्यमंत्री व भाजपा तुमच्या पाठीशी उभा राहून सन्मानाची वागणूक देईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार – सावंत, ब्रह्मानंद पडळकर, किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, संभाजी आलदार, दुर्योधन हिप्परकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.

यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे, उद्योजक भाऊसाहेब रूपनर, बाळासाहेब काटकर, ॲड. सचिन देशमुख, खरेदी विक्री संघाचे संचालक पोपट गडदे, बाळासाहेब झपके, उल्हास धायगुडे, संतोष करांडे, राणी दिघे, माजी सरपंच नंदकुमार दिघे, सीए जुबेर मुजावर, स्वाती मगर, शोभा फुले, वैशाली झपके, निवृत्ती फुले, प्रशांत वलेकर, राजू मगर, सुरेश चौगुले, सरपंच बंडू चव्हाण, प्रशांत वलेकर, महादेव चव्हाण, नितीन चव्हाण, मच्छिंद्र लेंडवे, यशवंत चव्हाण, समाधान चव्हाण, अभिमान चव्हाण, शिवाजी सातपुते, अनिल शहाजी पाळके, रघुनाथ पाटील, संतोष पाटील, संजय पाटील, अरुण दणके, सरपंच श्रीमंत गवंड, जय बनकर, उपसरपंच मोहन मिसाळ, सुभाष पवार यांच्यासह विविध गावांचे सरपंच, विकास संस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य आदी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रतेश केला

पुढे बोलताना पालकमंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुक्याला यापूर्वी देखील आपण विकास कामात मदत केली आहे. यापुढे आणखी चांगली मदत होईल, यात कोणी शंका बाळगू नये. इतर तालुक्यापेक्षा १ कोटीचा ज्यादाचा निधी डीपीडीसीतून सांगोला तालुक्याला दिला जाईल. बळीराजाला बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक भूमिकेमुळे होत आहे. त्यामुळेच बाधित झालेल्या शेतजमिनीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष प्रवेश हा तर फक्त ट्रेलर होता थोड्याच दिवसात वापेक्षा मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम आपणास घ्यावयाचा असून त्यावेळी शक्यतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहतील असे त्यांनी शेवटी सांगितले.

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेचे माजी सदस्य तसेच ग्रामपंचायत माजी सरपंच, सदस्य आणि विकास सोसायटी चेअरमन सदस्यांसह विविध प्रवेश झाल्याने सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार पडले. तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या देखील काही जणांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

स्व.आबासाहेबांना पाच निवडणुकीत साथ देऊन त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो. त्यांच्या पश्चात बंगल्यातील रिकाम्या खुर्चीवर माणूस बसवून पक्षातून बाहेर पडलोय. आता त्यांनी आमच्यासाठी त्यांची दारे बंद केल्याने तुम्ही आम्हाला पुन्हा त्यांच्या दावणीला बांधू नका, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याचे उद्योजक बाळासाहेब एरंडे यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!