सूर्योदय अर्बनच्या वतीने सभासदांना दीपावलीनिमित्त भेटवस्तूचे वाटप
दहा टक्के लाभांश व साखरेचा गोडवा यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

सूर्योदय अर्बनच्या वतीने सभासदांना दीपावलीनिमित्त भेटवस्तूचे वाटप
दहा टक्के लाभांश व साखरेचा गोडवा यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर , तालुका आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये उद्योग आणि व्यावसायिकांचा आर्थिक कणा म्हणून गेल्या सात ते आठ वर्षापासून अविरतपणे ग्राहकांचे सेवेत कार्यरत असलेली सूर्योदय अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर जिल्हा तसेच सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये कार्यरत असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थांच्या वतीने सर्व सभासदांसाठी दहा टक्के डिव्हिडंट यापूर्वीच जाहीर करण्यात आलेला असून संस्थेच्या कार्यालयामध्ये डिव्हिडंट वाटप सुरू आहे.
आदर्श नियमावलीनुसार 31 मार्च 2024 रोजीच्या शेअर्स रकमेवर डिव्हिडंड देण्यात येत असून डिव्हिडंट शिवाय सभासदांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दीपावली सणानिमित्त भेटवस्तू म्हणून पाच किलो साखरेचे वाटप देखील संस्थेमध्ये सुरू असल्याची माहिती या सर्व संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. ज्यांचा शेअर्स अडीच हजार रुपयांच्यावर आहे अशा सभासदांनाच भेटवस्तू देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या सभासद बांधवांचा शेअर्स अडीच हजार रुपयांच्या पेक्षा कमी असेल त्यांनी त्वरित आपल्या शेअर्सची रक्कम अडीच हजार रुपयांच्या वर न्यावी असे आवाहन देखील यावेळी इंगवले यांनी केले आहे.
अगदी आज जरी आपल्या शेअर्सची रक्कम अडीच हजार रुपयांच्या पुढे नेली तरी देखील त्या सभासद बांधवांना भेटवस्तू म्हणून साखरेचे किट देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. ठेवीदारांसाठी उत्कृष्ट व्याजदर देणारी व ग्राहक आणि सभासदांचे हित नजरेसमोर ठेवत विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत सोनेतारण कर्ज, दुग्ध व्यवसायासाठी कर्ज, छोटे मोठे उद्योग आणि व्यावसायिक यांना लागणारे कर्ज, शासकीय नोकरदार व सेवानिवृत्त पेन्शन धारकांसाठी देखील कर्ज सुविधा उपलब्ध करून देणारी सोलापूर जिल्ह्यातील ही एक अग्रगण्य संस्था असून हजारो सभासद व समाधानी ग्राहकांच्या सहकार्याने सुमारे 300 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठत संस्थेची सुमारे 500 कोटिंकडे दिमाखदार वाटचाल सुरू आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक आणि सूर्योदय उद्योग समूहाचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी राज्यातील काही आर्थिक संस्था अडचणीत येण्याची नेमकी कारणे याबद्दल सखोल माहिती सांगत सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेट या संस्थांची कशी वाटचाल सुरू आहे यावर प्रकाश टाकला. कर्ज वितरणाची पद्धत, संस्थेची गुंतवणूक आणि पारदर्शी कारभार यामुळे सूर्योदय संस्था भक्कमपणे वाटचाल करत असून सर्व ठेवीदार आणि सभासद यांनी मनापासून दाखवलेल्या विश्वासास सदैव पात्र राहू असे सांगत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अरविंद केदार, अरुण वाघमोडे आणि प्रा.भारत कसबे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना तिन्ही संस्थांच्या वाटचालीबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतनचे जगन्नाथ भगत गुरुजी व एल के पी मल्टीस्टेटचे व्हॉइस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ.अर्चनाताई इंगवले, व्हाईस चेअरमन सौ.ज्योती भगत, संचालिका सौ.मीनाक्षी दिघे, सौ सुरेखाताई लवटे, संचालक संतोष इंगवले, महादेव दिघे सर, सूर्योदय अर्बनच्या सचिव रेशमा कमले, त्याचबरोबर बंडोपंत इंगवले, प्रवीण गायकवाड , लक्ष्मण तेली गुरुजी, अण्णासो राऊत, समाधान घाडगे इत्यादी सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.